धक्कादायक! क्वारंटाईन सेंटरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2020 22:30 IST2020-09-15T22:29:17+5:302020-09-15T22:30:23+5:30
या प्रकरणी मुलीने दिलेल्या तक्रारीवरून मानखुर्द पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे.

धक्कादायक! क्वारंटाईन सेंटरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग
मुंबई : मानखुर्दच्या पीएमजीपी कॉलनीतील न्यू म्हाडा वसाहत क्वारंटाईन सेंटरमध्ये एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला आहे.
१७ वर्षीय मुलगी कोरोना पॉझिटिव असल्याने क्वारंटाईन सेंटर मध्ये उपचार घेत होती. सोमवारी या क्वारंटाईन सेंटर मध्ये निर्जंतुक फवारणी करण्यासाठी आलेला दिपेश सूर्यकांत साळवी (२०) हा तरुण या मुलीच्या जवळ आला. यावेळी त्याने मुलीचे हात पकडून तु मुझसे प्यार कर असे बोलुन छातीवरून हात फिरवला. तसेच चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुलीने त्याला प्रतिकार केला असता त्याने मुलीच्या गालावर चापट मारली. या प्रकरणी मुलीने दिलेल्या तक्रारीवरून मानखुर्द पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे.