खळबळजनक! भिवंडीत ३५ वर्षीय तरुणाची अज्ञात इसमाने केली हत्या
By नितीन पंडित | Updated: December 30, 2023 21:12 IST2023-12-30T21:12:40+5:302023-12-30T21:12:57+5:30
बरकतअली रोजमोहम्मद अंसारी असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव

खळबळजनक! भिवंडीत ३५ वर्षीय तरुणाची अज्ञात इसमाने केली हत्या
नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: शहरातील बाबला कंपाउंड परिसरात एका ३५ वर्षीय तरुणाचा अज्ञात इसमाने हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बरकतअली रोजमोहम्मद अंसारी वय ३५ वर्ष असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून सदर तरुण मूळचा बिहार राज्यातील असून सध्या तो भावासह पिराणीपाडा शांतीनगर येथे राहत होता. शुक्रवारी बाबला कंपाउंड येथील बाळा शेठ याच्या बंगल्याच्या मागे त्याचा मृतदेह आढळून आल्याने त्याचा भाऊ समशद अंसारी याने शांतीनगर पोलीस ठाण्यात चुलत भाऊ बरकतअली याच्या हत्ये प्रकरणी अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.