शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! भरधाव ट्रक बारमध्ये घुसून ११ जणांचा मृत्यू, ३० हून अधिक जखमी, चालक फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2024 09:22 IST

Truck Bar Accident: चालक अपघातानंतर पळून गेला असला तरी ट्रकमधून अव्होकॅडो घेऊन जात असलेल्या व्यक्तीला घेतलं ताब्यात

Truck Bar Accident: कॅरेबियन बेटांवरील देश डॉमिनिकन रिपब्लिकमध्ये एका बारमध्ये ट्रक घुसल्याने ११ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेत ३० हून अधिक जण जखमी झाले आहेत. सिव्हिल डिफेन्सचे संचालक जुआन सालास यांनी सांगितले की, राजधानी सँटो डोमिंगोच्या पश्चिमेला असलेल्या अझुआच्या दक्षिणेकडील विभागात रविवारी पहाटे हा अपघात झाला. अपघात कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झाले नाही. तपास अधिकारी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासत आहेत.

अपघातानंतर चालक फरार

पोलिस प्रवक्ते डिएगो पेस्केरा यांनी सांगितले की, पीडितांपैकी एक पोलिस कर्मचारीही आहे. ट्रकचा चालक घटनास्थळावरून पळून गेला आणि त्याचा पत्ता लागलेला नाही. पोलिसांनी ट्रकमधील एका प्रवाशाला ताब्यात घेतले. तो ॲव्होकॅडो घेऊन जात होते. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप माहिती मिळू शकलेले नाही.

आणखी एका अपघातात सात जणांचा मृत्यू

अमेरिकेतील मिसिसिपी येथे बस उलटून सात जणांचा मृत्यू झाला असून ३७ जण जखमी झाले. ही माहिती देताना मिसिसिपी हायवे पेट्रोलने सांगितले की, या अपघातात सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला. टायर फुटल्याने हा अपघात झाल्याचे नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डाने ट्विटरवर पोस्ट केले. वॉरेन काउंटीचे कोरोनर डग हस्की यांनी सांगितले की मृतांमध्ये सहा वर्षांचा मुलगा आणि त्याची १६ वर्षांची बहीण यांचा समावेश आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAccidentअपघात