शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

सासवड येथे शिवसेनेच्या तालुका उपप्रमुखाकडून पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2018 22:04 IST

पुरंदर तालुका शिवसेनाउपप्रमुखांनी साथीदारांसह सासवड पोलीस ठाण्याचे कर्मचारी प्रकाश पोपट यादव यांना बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी घडली.

ठळक मुद्देआरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडीमारहाणीत पोलीस कर्मचारी गंभीर जखमीसरकारी कामात अडथळा आणून मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

सासवड : सासवड(ता.पुरंदर) येथील फळ मार्केटच्या प्रवेशद्वाराजवळ पुरंदर तालुका शिवसेनाउपप्रमुखांनी साथीदारांसह सासवड पोलिस स्टेशनचे कर्मचारी प्रकाश पोपट यादव यांना बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी घडली. याप्रकरणी तीन आरोपींवर सरकारी कामात अडथळा आणून मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आाहे. विश्वास बबन काटकर (वय ४० रा.सुपे खुर्द ता. पुरंदर )आणि राजेंद्र बाळकृष्ण पिलाने(वय ४०) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत. या मारहाणीत जखमी झालेले पोलीस शिपाई यादव यांना ग्रामीण रुग्णालय सासवड येथे उपचारासाठी दाखल केले आहे.       याबाबत सासवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासवड पोलिस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यादव हे सासवड शहरातील फळ  मार्केटच्या प्रवेशद्वाराजवळ वाहतूक कोंडी सुरळीत करत असतानाकाटकर व   पिलाने आणि यांच्यासोबत असणारा अजून एक अनोळखी व्यक्ती अशा तिघा आरोपींनी अचानक मारुती ओमनी कार क्रमांक (एमएच-१२  डीएम.२२७०)मध्ये घुसवली. चारचाकी राजेंद्र पिलाने चालवत होता. पोलीस कर्मचारी यादव व माने यांनी आरोपीस वाहन थांबविण्याचा इशारा केला. मात्र, आरोपींनी यादव व माने यांनी केलेल्या इशाºयाकडे दुर्लक्ष करत गाडीतून खाली उतरून पोलिसांना शिवीगाळ करत तीनही आरोपींना पोलीस कर्मचारी यादव यांना बेदम मारहाण केली. तसेच मोठमोठ्याने आरडाओरडा करत दहशत माजविण्याचा प्रयत्न देखील केला. त्यांनी या भागातील सर्व दुकाने बंद केली.या मारहाणीत यादव गंभीर जखमी झालेले असून त्यांना उपचारासाठी सासवडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.सदर प्रकरणातील आरोपी विश्वास काटकर हा शिवसेना पुरंदर तालुका उपप्रमुख या पदावर आहे. या प्रकरणी तीनही आरोपींवर सरकारी कामात अडथळा आणून मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपींना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गुन्हा दाखल होवू नये म्हणून जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे स्वीय सहायक माणिक निंबाळकर यांनी पोलिसांवर प्रचंड दबाव आणला. परंतु, पोलिसांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :PuneपुणेPurandarपुरंदरJejuriजेजुरीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी