वसईत महिला पत्रकाराला शिवसैनिकाने केली भररस्त्यात अश्लील शिवीगाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 21:57 IST2019-08-06T21:55:45+5:302019-08-06T21:57:42+5:30
शेखर वैद्य या शिवसेनेच्या कार्यकर्त्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आला आहे.

वसईत महिला पत्रकाराला शिवसैनिकाने केली भररस्त्यात अश्लील शिवीगाळ
वसई - एका मराठी वृत्तपत्राच्या वसई तालुक्याच्या महिला पत्रकाराला शिवसेनेच्या कार्यकर्त्याने अश्लील शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार वसईत घडला आहे. याप्रकरणी वसई पोलीस ठाण्यात शेखर वैद्य या शिवसेनेच्या कार्यकर्त्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आला आहे.
महिला पत्रकार वैष्णवी राऊत यांना भररस्त्यात मंगळवारी दुपारच्या सुमारास शेखर वैद्य यांनी अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. नँशनल युनियन आँफ जर्नालिस्टस महाराष्ट्र (NUJM) पालघर जिल्ह्याच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करीत असून आरोपी शेखर वैद्य याला पोलिसांनी तात्काळ अटक करून कठोर शासन देण्याची मागणी संघटनेच्या महाराष्ट्र अध्यक्षा शीतल करदेकर, कोषाध्यक्ष वैशाली आहेर, सचिव सीमा भोईर यांच्या नेतृत्वाखाली पालघर जिल्हाध्यक्ष विजय देसाई, उपाध्यक्ष उमाकांत वाघ, सचिव अनिल पाटील कोषाध्यक्ष रवींद्र घरत, सत्यवान तरे यांनी केली आहे. जर या प्रकरणी गुन्हा दाखल न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणी वसई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर पुकळे यांनी सर्वतोपरी सहकार्य करून आरोपीला अटक करण्यासाठी पोलीस रवाना झाल्याचे सांगितले आहे.
महिलांचा सन्मान व्हायलाच हवा शिवरायांच्या या पवित्र भूमीत शिवसेना पक्षाचे हे कार्यकर्ते महिला पत्रकाराला अभद्र भाषेत धमकावण्याचे निंदनीय काम करत आहेत. अशा बेताल शेखर वैद्य यांच्यावर वसई पोलीसांनी व शिवसेना पक्षानेही कठोर कारवाई करावी अशी मागणी एनयुजेएम अध्यक्ष शीतल करदेकर यांनी केली आहे.
वसई - महिला पत्रकाराला शिवसैनिकाने केली भररस्त्यात अश्लील शिवीगाळ https://t.co/mD82AatBXl
— Lokmat (@MiLOKMAT) August 6, 2019