शिवसेना आमदार वैभव नाईक आणि पोलिसांमध्ये सह्याद्री अतिथीगृहाबाहेर वादावादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 21:43 IST2019-01-29T21:42:43+5:302019-01-29T21:43:40+5:30

वैभव नाईक यांना अतिथीगृहात जाण्यास पोलिसांनी अडवल्याने वैभव नाईक यांचा पारा चढला आणि त्यांनी पोलिसांशी वाद घालायला सुरुवात केली.

Shiv Sena MLA Vaibhav Naik and police in the Sahyadri guesthouse dispute outside the house | शिवसेना आमदार वैभव नाईक आणि पोलिसांमध्ये सह्याद्री अतिथीगृहाबाहेर वादावादी

शिवसेना आमदार वैभव नाईक आणि पोलिसांमध्ये सह्याद्री अतिथीगृहाबाहेर वादावादी

ठळक मुद्देअखेर पोलिसांना न जुमानता नाईक यांनी अतिथीगृहामध्ये प्रवेश केला. सह्याद्री अतिथीगृहात मंत्रीमंडळाची बैठक सुरु असल्यानं पोलिसांनी आमदार वैभव नाईक यांना आत जाण्यास मज्जाव केला. मात्र शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांना आत सोडल्यानं नाईकांना संताप अनावर झाला आणि त्यानी पोलिसांशी बाचाबाची केली. 

मुंबई - सह्याद्री अतिथीगृहाबाहेर पोलिसांनी रोखल्याने शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्यात जोरदार वादावादी झाली. अतिथीगृहाच्या प्रवेशद्वारावर पोलिसांनी अडवल्याने शिवसेना आमदार वैभव नाईक संतप्त झाले. त्यांनी पोलिसांशी वाद घातला. अखेर पोलिसांना न जुमानता नाईक यांनी अतिथीगृहामध्ये प्रवेश केला. कुडाळचे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी मुंबई येथील सह्याद्री आतिथीगृहाच्या गेटवर पोलिसांशी बाचाबाची केल्याचा प्रकार आज समोर आला आहे. वैभव नाईक यांना अतिथीगृहात जाण्यास पोलिसांनी अडवल्याने वैभव नाईक यांचा पारा चढला आणि त्यांनी पोलिसांशी वाद घालायला सुरुवात केली.

सह्याद्री अतिथीगृहात मंत्रीमंडळाची बैठक सुरु असल्यानं पोलिसांनी आमदार वैभव नाईक यांना आत जाण्यास मज्जाव केला. मात्र शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांना आत सोडल्यानं नाईकांना संताप अनावर झाला आणि त्यानी पोलिसांशी बाचाबाची केली. विनायक मेटे यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा असल्यानं त्यांची गाडी आत सोडण्यात आली असल्याचं पोलिसांनी नाईकांना सांगितलं. मात्र, तरी देखील नाईक शांत झाले नाही आणि त्यांनी पोलिसांना न जुमानता सह्याद्री अतिगृहात प्रवेश केला. घडलेल्या प्रकारामुळे गेटवर काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Web Title: Shiv Sena MLA Vaibhav Naik and police in the Sahyadri guesthouse dispute outside the house