पोर्नोग्राफी प्रकरणात शिल्पा शेट्टीच्या भूमिकेबाबत मॉडेलचा सनसनाटी दावा, म्हणाली, “ती कंपनीची डायरेक्टर, तिला…”

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 02:28 PM2021-07-21T14:28:26+5:302021-07-21T14:28:55+5:30

Raj kundra pornography Case: पोर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राला झालेल्या अटकेनंतर आता या प्रकरणातील शिल्पा शेट्टीच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. त्यातच आता एका मॉडेलने या प्रकरणात शिल्पा शेट्टीवर गंभीर आरोप केले आहेत.

"Shilpa Shetty is a director of the company, she knows everything", sagarika shona suman's sensational claim in a pornography case | पोर्नोग्राफी प्रकरणात शिल्पा शेट्टीच्या भूमिकेबाबत मॉडेलचा सनसनाटी दावा, म्हणाली, “ती कंपनीची डायरेक्टर, तिला…”

पोर्नोग्राफी प्रकरणात शिल्पा शेट्टीच्या भूमिकेबाबत मॉडेलचा सनसनाटी दावा, म्हणाली, “ती कंपनीची डायरेक्टर, तिला…”

Next

मुंबई - पोर्नोग्राफी प्रकरणात प्रख्यात अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याला अटक करण्यात आल्याने सिनेजगतात खळबळ उडालेली आहे. त्यातच राज कुंद्राला झालेल्या अटकेनंतर आता या प्रकरणातील शिल्पा शेट्टीच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. त्यातच आता एका मॉडेलने या प्रकरणात शिल्पा शेट्टीवर गंभीर आरोप केले आहेत. ("Shilpa Shetty is a director of the company, she knows everything", sagarika shona suman's sensational claim in a pornography case)

पोर्नोग्राफी प्रकरणात पोलिसांनी राज कुंद्रा याला मुख्य आरोपी ठरवले आहे. त्याला सध्या भायखळ्यातील तुरुंगात ठेवण्यात आले आहे. मात्र या प्रकरणात शिल्पा शेट्टीची काही भूमिका आहे, असे दिसत नाही असे पोलिसांनी सांगितले आहे. मात्र मॉडेल सागरिका शोना सुमन हिने शिल्पा शेट्टीवर गंभीर आरोप करत तिला या प्रकरणातील सारे काही माहिती असल्याचा दावा केला आहे.

मॉडेल सागरिका शोना सुमन ही तीच आहे जिने या प्रकरणात राज कुंद्राचा संबंध असल्याचा दावा केला होता. आता राज कुंद्रा याला अटक करण्यात आल्यानंतर सारगिकाने या प्रकरणाबाबत शिल्पा शेट्टीला सारे काही माहिती असल्याचे म्हटले आहे.

एबीपी न्यूजशी बोलताना सागरिकाने सांगितले की, कंपनीच्या संचालक आणि पार्टनर्समध्ये शिल्पा शेट्टीचे नाव आहे. एका संचालकाला त्याच्या कंपनीत काय चालले आहे हे माहिती नसेल असे कसे होऊ शकते. पोलिसांना शिल्पा शेट्टीची सुद्धा चौकशी केली पाहिजे. तिला राज कुंद्राच्या पोर्न रॅकेटबाबत नक्कीच माहिती असेल.  

दरम्यान, एका पोर्न सीरिजसाठी व्हॉट्सअॅप व्हिडिओमधून तिच्याकडे न्यूड ऑडिशनची मागणी करण्यात आली होती, असा आरोप सागरिका हिने केली होती. ती म्हणाली होती की, उमेशसोबतच्या व्हॉट्सअॅप कॉलवर राज कुंद्राही होता. मात्र त्याचा चेहरा मास्कखाली लपलेला होता, मात्र मी त्याला ओळखले होते. मी तेव्हा ही बाब कुणालाही सांगितली नव्हती. मात्र आता पोलिसांना बोलावल्यास मी त्यांना नक्की मदत करेन, असेही तिने सांगितले.  

English summary :
"Shilpa Shetty is a director of the company, she knows everything", sagarika shona suman's sensational claim in a pornography case

Web Title: "Shilpa Shetty is a director of the company, she knows everything", sagarika shona suman's sensational claim in a pornography case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app