धक्कादायक! रेशन कार्ड बनवण्यासाठी गेली, वाटेतच होणाऱ्या पतीसमोर सामूहिक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 20:33 IST2025-04-13T20:32:51+5:302025-04-13T20:33:48+5:30

उत्तर प्रदेशातील कासगंजमध्ये एका अल्पवयीन मुलीवर ८ नराधमांनी सामूहिक लैंगिक अत्याचार केला.

She went to get a ration card, but was gang-raped in front of her husband on the way | धक्कादायक! रेशन कार्ड बनवण्यासाठी गेली, वाटेतच होणाऱ्या पतीसमोर सामूहिक अत्याचार

धक्कादायक! रेशन कार्ड बनवण्यासाठी गेली, वाटेतच होणाऱ्या पतीसमोर सामूहिक अत्याचार

उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कासगंजमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. येथील पिकनिक पॉइंट नादराईच्या पुलावर तिच्या होणाऱ्या पतीसोबत बसलेल्या एका मुलीवर ८ नराधमांनी सामुहिक बलात्कार केला.

त्या तरुणीच्या पतीसमोरच गुन्हेगारांनी हा गुन्हा केला. ही घटना १० एप्रिल रोजी घडली. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आणि ५ गुन्हेगारांना अटक केली. त्याचबरोबर उर्वरित तीन गुन्हेगारांचा शोध तीव्र करण्यात आला आहे. पीडितेने आरोप केला आहे की, गुन्हेगारांनी तिच्या होणाऱ्या पतीसमोरच रोख रक्कम, कानातील वस्तू  आणि गळ्यातील चेन हिसकावून घेतली.

१०० हून अधिक फोन, आईनं पाठलाग केला तरीही ते थांबले नाहीत; २ मित्रांचा रहस्यमय मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, तरुणी तिच्या होणाऱ्या पतीसोबत रेशन कार्ड बनवण्यासाठी गेली होती. तिथून परतताना पॉइंट नादराई पुलावर थांबलो आणि जेवण केले. दरम्यान, पाच गुन्हेगार तिथे आले आणि त्यांनी त्यांना धमकावले आणि तिच्या मंगेतराकडून ५ हजार रुपये हिसकावून घेतले. यानंतर आरोपीचे आणखी तीन साथीदार आले. या लोकांनी तिला आणि तिच्या होणाऱ्या पतीला पकडून मारहाण केली आणि झुडपात ओढून नेले. तिथे तीन नराधमांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

५ आरोपींना अटक

पीडितेच्या माहितीनुसार, आरोपींच्या तावडीतून सुटल्यानंतर, ती घरी पोहोचली तेव्हा तिने संपूर्ण घटना तिच्या कुटुंबाला सांगितली. सामाजिक कलंकामुळे त्यावेळी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली नव्हती. दुसऱ्या दिवशी, जेव्हा शेजारच्या लोकांनी तिला समजावून सांगितले तेव्हा ती पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली. कासगंजच्या एसपी अंकिता शर्मा म्हणाल्या की, घटनेची माहिती मिळताच त्यांनी वेगवेगळ्या पोलिस पथके तयार केली होती. या पथकांनी छापे टाकून ५ गुन्हेगारांना अटक केली आहे.

Web Title: She went to get a ration card, but was gang-raped in front of her husband on the way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.