'त्या'ने एक्स गर्लफ्रेंडचा व्हिडीओ चॅट पॉर्न साईटवर केले वायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 16:18 IST2019-01-24T16:17:20+5:302019-01-24T16:18:25+5:30
याप्रकरणी पीडित तरुणीने पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानुसार पोलिसांनी आरोपी २२ वर्षीय तरुणाला जेरबंद केले आहे.

'त्या'ने एक्स गर्लफ्रेंडचा व्हिडीओ चॅट पॉर्न साईटवर केले वायरल
मुंबई - पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणीसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. पीडित तरुणीचे तिच्या अगोदरच प्रियकरासोबत अनेकदा व्हिडीओ चाट झाले होते. या व्हिडीओ चॅटमधील एक व्हिडीओ चॅट ब्रेक अप झाल्यानंतर प्रियकराने एक्स गर्लफ्रेंडचे त्याच्यासोबत झालेले व्हिडीओ चॅट एका पॉर्न साईटवर वायरल केले. याप्रकरणी पीडित तरुणीने पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानुसार पोलिसांनी आरोपी २२ वर्षीय तरुणाला जेरबंद केले आहे.
अटक आरोपी हा पेशाने इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे. त्याचे पीडित मुलीची प्रेमप्रकरण होते. मात्र, काही कारणाने प्रेमप्रकरण संपुष्टात आलं. त्यानंतर अचानक पीडित मुलीच्या २१ वर्षीय मुलीने तिचा व्हिडीओ एका पॉर्न साईटवर वायरल झाल्याचे सांगितले. त्यावेळी पीडित मुलीने पवई पोलीस ठाण्यात धाव घेत संबंधित तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर २२ वर्षीय तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.