प्रेमाच्या बदल्यात 'ति'नं HIV दिला, संतापलेल्या प्रियकरानं प्रेयसीला जीवे मारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 13:05 IST2022-05-11T13:05:03+5:302022-05-11T13:05:26+5:30

महिलेमुळे युवकालाही HIV ची लागण झाली त्यामुळे संतापलेल्या युवकाने महिलेला जीवे मारले.

She gave HIV in exchange for love, boyfriend kills girlfriend | प्रेमाच्या बदल्यात 'ति'नं HIV दिला, संतापलेल्या प्रियकरानं प्रेयसीला जीवे मारले

प्रेमाच्या बदल्यात 'ति'नं HIV दिला, संतापलेल्या प्रियकरानं प्रेयसीला जीवे मारले

एका विवाहित महिलेशी संबंध ठेवणं युवकाला चांगलंच महागात पडलं आहे. मागील २ वर्षापासून युवक आणि महिलेमध्ये अफेअर सुरू होतं. परंतु एकेदिवशी युवकाने विवाहित महिलेचा गळा दाबून तिचीच निर्दयी हत्या केल्याचं उघड झालं. स्वत: एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचं माहिती असताना महिलेने युवकाशी संबंध बनवले. महिलेने युवकापासून HIV असल्याचं लपवून ठेवले. मात्र ज्यावेळी युवकाला HIV झाला तेव्हा त्याला ही गोष्ट कळाली. त्यामुळे युवकाचा संताप अनावर झाला.

महिलेमुळे युवकालाही HIV ची लागण झाली त्यामुळे संतापलेल्या युवकाने महिलेला जीवे मारले. हे प्रकरण यूएसच्या क्विन्स येथील आहे. याठिकाणी ४४ वर्षीय डेविड बोनोलाने सांगितले की, त्याने ५१ वर्षीय महिलेची हत्या केली आहे. मागील मंगळवारी या हत्येच्या आरोपाखाली डेविडला दोषी ठरवण्यात आले. महिला २ मुलांची आई होती. कोर्टात दिलेल्या कागदपत्रानुसार, जेव्हा २० एप्रिलला पोलिसांनी डेविडची चौकशी सुरू केली तेव्हा त्याने महिलेने जाणूनबुजून माझ्याशी संबंध ठेवत मला HIV दिल्याचा दावा केला.

तसेच ती महिला माझ्याशी खोटं बोलली. तिने माझा वापर करून घेतला. ती माझ्यावर प्रेम करत असल्याचं नाटक करत होती. माझ्यासोबत ती इतरांशीही संपर्कात होती. एका व्यक्तीसोबत ती राहू शकत नव्हती. तिच्या लॅपटॉपमध्ये अनेक पॉर्न व्हिडीओ होते. या महिलेची हत्या केल्यानंतर मी तिचा लॅपटॉप एका नदीत फेकून दिला. ज्याठिकाणी आम्ही दोघं कायम भेटत होतो. हत्येनंतर डेविडने मृत महिलेचा मृतदेह एका बॅगेत भरून तो फेकून दिला होता असं वृत्त डेली मेलमध्ये देण्यात आले आहे.

पोलिसांनी सांगितल्यानुसार, एका अज्ञात महिलेचा मृतदेह आम्हाला बॅगेत भरल्याचं आढळून आले. या महिलेच्या शरीरावर जवळपास ६० ठिकाणी चाकूने वार केल्याच्या खूणा होत्या. या महिलेचा गळाही दाबण्यात आला होता. या प्रकरणाची चौकशी केली तेव्हा आरोपी डेविड बोनोला हाती लागला. त्यानंतर कोर्टाने या प्रकरणी डेविडला दोषी ठरवत शिक्षा सुनावली. महिलेच्या हत्या प्रकरणात डेविडला २५ वर्ष जेलमध्ये राहण्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Web Title: She gave HIV in exchange for love, boyfriend kills girlfriend