आईचं स्वप्न पूर्ण करून झाली होती SWAT कमांडो; कोण होती काजल जिला पतीने डंबेल्स मारून संपवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 19:55 IST2026-01-30T19:53:15+5:302026-01-30T19:55:24+5:30

काजल यांची आई मीना यांना पोलीस अधिकारी व्हायचे होते, पण परिस्थितीमुळे त्या होऊ शकल्या नाहीत. आपल्या मुलीने हे स्वप्न पूर्ण करावे, यासाठी त्यांनी तिला लहानपणापासून प्रोत्साहन दिले.

She fulfilled her mother's dream and became a SWAT commando; Who was Kajal whose husband killed her with dumbbells? | आईचं स्वप्न पूर्ण करून झाली होती SWAT कमांडो; कोण होती काजल जिला पतीने डंबेल्स मारून संपवले

आईचं स्वप्न पूर्ण करून झाली होती SWAT कमांडो; कोण होती काजल जिला पतीने डंबेल्स मारून संपवले

जिच्या खांद्यावर दिल्लीच्या सुरक्षेची जबाबदारी होती, जिने जिद्दीने कमांडोचे कठीण प्रशिक्षण पूर्ण केले होते, तीच लेक आपल्याच घरात सुरक्षित नव्हती. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलमध्ये 'स्वाट' कमांडो असलेल्या २७ वर्षीय काजल यांची त्यांच्याच पतीने निर्घृण हत्या केली. धक्कादायक म्हणजे, काजल या चार महिन्यांच्या गरोदर होत्या. हुंड्याच्या हव्यासापोटी एका महिला कमांडोचा असा अंत झाल्याने दिल्ली पोलीस दलासह सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

नेमकं काय घडलं?

ही थरारक घटना २२ जानेवारी रोजी दिल्लीच्या द्वारका परिसरात घडली. काजल आणि त्यांचा पती अंकुर चौधरी यांच्यात वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संतापलेल्या अंकुरने व्यायामाच्या लोखंडी डंबेलने काजल यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. इतक्यावरच न थांबता त्याने त्यांचे डोके दरवाजाच्या चौकटीवर आपटले. गंभीर जखमी झालेल्या काजल यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना 'ब्रेन डेड' घोषित केले होते. मंगळवारी त्यांची प्राणज्योत मालवली.

आईचे अधुरे स्वप्न अन् काजलची जिद्द

मूळची हरियाणाच्या गन्नौरची असलेली काजल ही आपल्या आईचे स्वप्न जगत होती. काजल यांची आई मीना यांना पोलीस अधिकारी व्हायचे होते, पण परिस्थितीमुळे त्या होऊ शकल्या नाहीत. आपल्या मुलीने हे स्वप्न पूर्ण करावे, यासाठी त्यांनी तिला लहानपणापासून प्रोत्साहन दिले. काजलनेही आईचा शब्द राखत २०२२ मध्ये दिल्ली पोलीस दलात प्रवेश केला. केवळ कॉन्स्टेबल राहण्यापेक्षा काहीतरी वेगळे करण्याची जिद्द असल्याने तिने कठीण कमांडो ट्रेनिंग पूर्ण करून 'SWAT' युनिटमध्ये स्थान मिळवले होते.

हुंडा आणि हव्यासाने घेतला बळी

काजल आणि अंकुर यांची कॉलेजमध्ये ओळख झाली होती. अंकुर संरक्षण मंत्रालयात लिपिक म्हणून कार्यरत आहे. काजल यांच्या आईने आरोप केला आहे की, लग्नानंतर काही दिवसांतच सासरच्या मंडळींनी गाडी आणि रोख रकमेसाठी काजलचा छळ सुरू केला होता. काजलचा भाऊ निखिल, जो स्वतः दिल्ली पोलिसात आहे, त्याने सांगितले की, "ज्यावेळी अंकुरने काजलवर हल्ला केला, तेव्हा माझा तिच्याशी फोनवर बोलणे सुरू होते. मला फोनवर माझ्या बहिणीच्या किंकाळ्या ऐकू येत होत्या, पण मी काहीच करू शकलो नाही."

एका कर्तबगार महिला कमांडोचा प्रवास अशा प्रकारे संपल्याने गुन्हेगारी आणि हुंडाबळीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

Web Title : SWAT कमांडो की पति द्वारा हत्या: दहेज मृत्यु से दिल्ली पुलिस स्तब्ध

Web Summary : दिल्ली SWAT कमांडो काजल, गर्भवती और अपनी माँ का सपना पूरा कर रही थी, दहेज की मांगों को लेकर उसके पति ने उसकी हत्या कर दी। पति ने डम्बल से हमला किया, जिससे उसकी मौत हो गई। पुलिस ने आरोपी को गिरफ्तार किया, एक साहसी महिला के दुखद अंत को उजागर किया।

Web Title : SWAT Commando Killed by Husband: Dowry Death Shocks Delhi Police

Web Summary : Delhi SWAT commando Kajal, pregnant and fulfilling her mother's dream, was murdered by her husband over dowry demands. The husband attacked her with a dumbbell, leading to her death. Police arrested the accused, highlighting the tragic end of a courageous woman.