पूर्ववैमनस्यातून तरुणावर धारदार हत्याराने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 19:40 IST2019-04-16T19:39:08+5:302019-04-16T19:40:00+5:30

पूर्ववैमनस्यातून तरुणावर धारदार हत्याराने वार करत त्याच्या मित्रांना लाथाबुक्यांनी मारहाण करण्यात आली.

sharp weapon attack on Young due to former issues | पूर्ववैमनस्यातून तरुणावर धारदार हत्याराने वार

पूर्ववैमनस्यातून तरुणावर धारदार हत्याराने वार

पिंपरी : पूर्ववैमनस्यातून तरुणावर धारदार हत्याराने वार करत त्याच्या मित्रांना लाथाबुक्यांनी मारहाण करण्यात आली. ही घटना पिंपरीतील मेन बाजार येथे रविवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. 
सचिन सुर्वे (वय ३०, रा. भिमनगर, पिंपरी) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अनिकेतबापू सरोदे (वय २३, रा. बौद्धनगर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सरोदे व त्यांचे मित्र राकेश शिंदे (वय २४), अक्षय भाऊसाहेब भाकरे हे रविवारी रात्री दहाच्या सुमारास फिर्यादी मिरवणुकीतील देखावे पाहण्यासाठी जात असताना तेथील मंडळातील मुलांनी फिर्यादी व त्यांच्या मित्रांना नाचण्यासाठी ओढले. त्यानंतर गर्दीचा फायदा घेवून पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरुन सुर्वे याने सरोदे यांच्या मानेवर धारदार हत्याराने वार केले. व त्यांच्या मित्रांना हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यामध्ये भाकरे यांचा मोबाईल हरवला. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title: sharp weapon attack on Young due to former issues