लज्जास्पद! १० हजारांना वडिलांनी विकलेल्या विधवा मुलीवर सामूहिक बलात्कार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 15:50 IST2019-05-13T15:48:31+5:302019-05-13T15:50:53+5:30

शोषित महिलेने शेवटी स्वत:ला पेटवून घेतले.

Shameful! Gang rape on widowed girl who sold 10 thousand to father | लज्जास्पद! १० हजारांना वडिलांनी विकलेल्या विधवा मुलीवर सामूहिक बलात्कार 

लज्जास्पद! १० हजारांना वडिलांनी विकलेल्या विधवा मुलीवर सामूहिक बलात्कार 

ठळक मुद्देमहिलेने २८ एप्रिलला स्वत:ला पेटवून घेतले.ही महिला ८० टक्के भाजली असून दिल्लीच्या खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु आहे.पीडित महिलेने मदत मागितल्यानंतर पोलिसांनी केलेल्या हलगर्जीपणामुळे हापूर पोलिसांच्या चौकशीची सुद्धा मागणी करण्यात आली आहे.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशात मेरठ येथे धक्कादायक घटना घडली आहे. २० वर्षीय महिलेच्या नवऱ्याचे निधन झाल्यानंतर तिच्या वडिलांनी मुलीची १० हजार रुपयांना विक्री केली. ज्या व्यक्तीने विधवा महिलेला विकत घेतले त्याने आणि त्याच्या मित्रांनी या महिलेवर सामूहिक बलात्कार केला. त्यावेळी या महिलेने मदतीसाठी पोलिसांकडे धाव घेतली. मात्र, पोलिसांनी देखील तिच्याकडे लक्ष दिले नाही. यांनतर शोषित महिलेने शेवटी स्वत:ला पेटवून घेतले. ही महिला ८० टक्के भाजली असून दिल्लीच्या खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु आहे. 

पश्चिम उत्तर प्रदेशातील हापूर येथे रहाणाऱ्या या महिलेची नवऱ्याच्या निधनानंतर विक्री करण्यात आली. ज्याने या महिलेला विकत घेतले त्याने अनेकांकडून कर्ज घेतले होते. कर्जाची परतफेड म्हणून तो या विधवा महिलेला त्यांच्याकडे घरकामासाठी पाठवत असे. तिथे या महिलेला खूप शोषण केले जायचे. तिच्यावर बलात्कार करण्यात आला. उत्तर प्रदेश पोलिसांनी आता या प्रकरणाची दखल घेऊन तपासाला सुरुवात केली आहे. १४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती हापूरचे एसपी यशवीर सिंह यांनी दिली.

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालिवाल यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून महिलेला न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात उत्तर प्रदेश पोलिसांचे वर्तन अत्यंत लज्जास्पद असून त्यांनी दाखवलेल्या असंवेदनशीलतेमुळे पीडित महिलेने स्वत:ला पेटवून घेतले असे दिल्ली महिला आयोगाच्या पत्रात म्हटले आहे. पोलीसही तक्रारीची दखल घेत नसल्यामुळे महिलेने २८ एप्रिलला स्वत:ला पेटवून घेतले. स्वाती मालिवाल यांनी आपल्या पत्रात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पीडित महिलेला योग्य ती नुकसान भरपाई देण्याची विनंती केली आहे. पीडित महिलेने मदत मागितल्यानंतर पोलिसांनी केलेल्या हलगर्जीपणामुळे हापूर पोलिसांच्या चौकशीची सुद्धा मागणी करण्यात आली आहे.

 

Web Title: Shameful! Gang rape on widowed girl who sold 10 thousand to father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.