लज्जास्पद! ६ वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार, पीडितेच्या डोळ्यांना गंभीर दुखापत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 22:16 IST2020-04-24T22:13:41+5:302020-04-24T22:16:04+5:30

नराधमास पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Shame! Rape on 6-year-old girl, serious injury to the victim's eyes in madhya pradesh pda | लज्जास्पद! ६ वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार, पीडितेच्या डोळ्यांना गंभीर दुखापत

लज्जास्पद! ६ वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार, पीडितेच्या डोळ्यांना गंभीर दुखापत

ठळक मुद्देपीडित मुलीवर रुग्णालयात उपचार सुरु असून तिची प्रकृती नाजूक आहे. पोलिसांनी नराधम आरोपीस अटक केली आहे.  बुधवारी संध्याकाळी ही मुलगी आपल्या घराबाहेर खेळत असताना हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

दमोह - मध्य प्रदेशात दमोह परिसरात घराजवळच एका ६ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना बुधवारी सायंकाळी घडली. ६ वर्षीय मुलीवर अज्ञात व्यक्तीने बलात्कार करुन तिच्या डोळ्यांना गंभीर दुखापत केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित मुलीवर रुग्णालयात उपचार सुरु असून तिची प्रकृती नाजूक आहे. पोलिसांनी नराधम आरोपीस अटक केली आहे.

 बुधवारी संध्याकाळी ही मुलगी आपल्या घराबाहेर खेळत असताना हा धक्कादायक प्रकार घडला आहे. गुरुवारी सकाळी ही मुलगी बेशुद्ध अवस्थेत तिच्या घरापासून काही अंतरावर सापडली.  या प्रकाराची माहिती कळताच मुलीच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अटक आरोपीने पीडित मुलीवर निर्जनस्थळी नेऊन बलात्कार केला आहे. पीडित मुलीच्या डोळ्यांनाही या व्यक्तीने गंभीर दुखापत केली आहे. तिच्या चेहऱ्यावरही जमखा झालेल्या आहेत. मुलीला ताबडतोक स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र तिच्या डोळ्यांना झालेली दुखापत लक्षात घेता तिला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी हेमंतसिंग चौहान यांनी सांगितले की, "तिच्यावर बलात्कार केला होता आणि तिच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे."

Web Title: Shame! Rape on 6-year-old girl, serious injury to the victim's eyes in madhya pradesh pda