लज्जास्पद! घरात घुसून अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार 

By पूनम अपराज | Updated: November 12, 2020 21:07 IST2020-11-12T21:06:37+5:302020-11-12T21:07:29+5:30

Rape : झोपलेल्या मुलीवर बलात्कार केला. नंतर ते पळून गेले. मुलीचा आरडाओरडा ऐकून कुटुंबीयांनी घरात धाव घेतली.

Shame! He entered into the house and raped a minor girl | लज्जास्पद! घरात घुसून अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार 

लज्जास्पद! घरात घुसून अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार 

ठळक मुद्देपीडित मुलीच्या कुटुंबियांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. सकाळी पोलीस आले आणि पीडित मुलीची चौकशी केली.

देवरियाच्या गौरीबाजार पोलिस स्टेशन परिसरातील एका गावात मंगळवारी रात्री उशिरा दोन अल्पवयीन मुलांनी घरात घुसून झोपलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला व तेथून पळ काढला. पीडित मुलीची मुलगी सांगितल्यानंतर कुटुंबाच्या वतीने आरोपींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेनंतर आरोपी फरार आहेत.

गौरीबाजार पोलिस स्टेशन परिसरातील एका गावात 14 वर्षाची मुलगी खोलीत झोपली होती. घरातील इतर मंडळी बाहेर झोपली होती. रात्री उशिरा दोन अल्पवयीन मुलांनी घरात प्रवेश केला आणि खोलीत पेटलेला बल्ब विझविला, असा आरोप पीडितेने केला आहे. यानंतर झोपलेल्या मुलीवर बलात्कार केला. नंतर ते पळून गेले. मुलीचा आरडाओरडा ऐकून कुटुंबीयांनी घरात धाव घेतली.

पीडित मुलीच्या कुटुंबियांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. सकाळी पोलीस आले आणि पीडित मुलीची चौकशी केली. पोलीस कोठडीत असलेल्या काही लोकांची चौकशी करत आहेत. हे प्रकरण संशयास्पद असल्याचे दिसत असल्याचे स्टेशन प्रमुख अश्वनी कुमार राय यांनी सांगितले. याची तपासणी करून कारवाई केली जाईल असे देखील ते पुढे म्हणाले, अशी माहिती लाईव्ह हिंदुस्थानने दिली आहे. 

Web Title: Shame! He entered into the house and raped a minor girl