हातात कोयता घेऊन दहशत माजविणाऱ्यास बेड्या
By नामदेव भोर | Updated: June 8, 2023 17:15 IST2023-06-08T17:12:52+5:302023-06-08T17:15:05+5:30
नामदेव भोर/ नाशिक नाशिक : पाथर्डी फाटा येथील स्वराजनगर परिसरात हातात कोयता घेऊन दहशत माजविणाऱ्या संशयित श्याम यशवंत जाधव ...

हातात कोयता घेऊन दहशत माजविणाऱ्यास बेड्या
नामदेव भोर/ नाशिक
नाशिक : पाथर्डी फाटा येथील स्वराजनगर परिसरात हातात कोयता घेऊन दहशत माजविणाऱ्या संशयित श्याम यशवंत जाधव यास बिट मार्शल संतोष कोरडे व मंगेश आव्हाड यांनी गुन्हे शोध पथकाच्या मदतीने अटक करून त्याच्याकडून धारदार कोयता हस्तगत केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिट मार्शल संतोष कोरडे व मंगेश आव्हाड बुधवारी (दि.७) गस्त घालत होते. त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे स्वराजनगर कॉलनी रस्त्यावर एक जण हातात कोयता घेऊन दहशत माजवित असताना रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास आढळून आला. त्याला कोरडे व आव्हाड यांनी पकडून घटनेची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश न्यायदे यांना कळवली.
त्यामुळे इंदिरानगर पोलिस ठाण्यातून त्यांच्या मदतीसाठी तत्काळ गुन्हे शोधक पथकाचे युवराज पाटील, सागर परदेशी, मुश्रीफ शेख, वसंत ढगे, यांचे पथक रवाना झाले. त्यांनी संशयितास ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. यावेळी संशयित श्याम यशवंत जाधव (२३, समर्थ नगर, म्हाडा कॉलनी. वडाळा -पाथर्डी रस्ता) असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याकडून कोयता हस्तगत करण्यात आला असून इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.