शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शाब्बास मुंबई पोलीस...पुण्यात चोरलेले बाळ पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुन्हा आले आईच्या कुशीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 20:25 IST

आईच्या कुशीत बाळ विसावेपर्यंत त्याला आंघोळ घालणं, दूध पाजणं या सगळ्या संगोपनाच्या गोष्टी ओशिवरा पोलिसांनी सांभाळल्या. मुंबई पोलिसांच्या या कर्तव्यतत्परतेमुळे आज आंबोली आणि ओशिवरा पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

मुंबईपुणे रेल्वे स्थानकातून पळवलेल्या ४ महिन्यांच्या बाळाची सुटका करून ते पुन्हा त्याच्या आईकडे सोपवण्याची कौतुकास्पद कामगिरी मुंबईपोलिसांनी केली आहे. १७ ऑगस्ट रोजी हे बाळ आईची नजर चुकवून भिकारी महिलेने चोरले होते. या बाळाला हातात घेऊन ही महिला भीक मागत होती. महिला आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे या बाळाला पुन्हा आपल्या आईच्या कुशीत विसावता आलं आहे. मनिषा महेश काळे (वय - २५) असे या बाळ चोरणाऱ्या महिलेचे नाव आहे.

बकरी ईदच्या निमित्ताने मुंबईत कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता आणि अनेक ठिकाणी पोलीस गस्त देखील घालत होते. एका महिलेने सकाळी ११ च्या सुमारास भिकारी महिलेच्या हातातील बाळ हे तिचे वाटत नसल्याचा संशय आंबोली पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाकडे व्यक्त केला. ही माहिती मिळताच मोबाईल व्हॅनमधील पोलीस पथकाने तात्काळ बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूल येथे धाव घेतली आणि संशयित महिलेला ताब्यात घेतले. या महिलेची चौकशी केली असता तिने हे बाळ चोरल्याचे कबूल केले.

ही घटना ओशिवरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असल्याने हे बाळ ओशिवरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ओशिवरा पोलिसांनी देखील लागलीच पुणे रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला. बाळचोरीला गेल्याचा गुन्हा त्यांच्याकडे नोंदवण्यात आल्याने बाळाच्या आईचा शोध घेणं सोपं झालं. या बाळाच्या आईला फोन करून तिचं बाळ सुखरूप असल्याचं पोलिसांनी सांगितलं. आईच्या कुशीत बाळ विसावेपर्यंत त्याला आंघोळ घालणं, दूध पाजणं या सगळ्या संगोपनाच्या गोष्टी ओशिवरा पोलिसांनी सांभाळल्या. मुंबई पोलिसांच्या या कर्तव्यतत्परतेमुळे आज आंबोली आणि ओशिवरा पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाMumbaiमुंबईPuneपुणेKidnappingअपहरणPoliceपोलिसrailwayरेल्वे