लहाग्यांचे अश्लील व्हिडीओ दाखवून नराधमांनी केले लैंगिक शोषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 20:53 IST2020-01-03T20:51:07+5:302020-01-03T20:53:44+5:30

नराधमांनी चार मुली वगळता आणखी काही मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा संशय पोलिसांना आहे.

Sexually exploited by showing obscene videos to minor girls | लहाग्यांचे अश्लील व्हिडीओ दाखवून नराधमांनी केले लैंगिक शोषण

लहाग्यांचे अश्लील व्हिडीओ दाखवून नराधमांनी केले लैंगिक शोषण

ठळक मुद्देतपासात ज्या गोष्टींचा खुलासा झाला त्याने पोलीस देखील चक्रावले.आतापर्यंत या संदर्भात चार तक्रारी पोलिसांकडे दाखल झाल्या आहेत.एका महिलेला हे नराधम नऊ वर्षाच्या शाळकरी मुलीसोबत गैरप्रकार करत असताना दिसले.

टिटवाळा - लहान मुलींना अश्लील व्हिडिओ दाखवून त्यांचे लैंगिक शोषण करणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनीअटक केली आहे. माधव मगर आणि विश्वनाथ तरणे असं या दोन नराधमांची नावे आहेत. याप्रकरणी टिटवाळा पोलीस तपास करत असून आतापर्यंत चार पीडित लहान मुलींचे शोषण केल्याची माहिती उघड झाली आहे. नराधमांनी चार मुली वगळता आणखी काही मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्याअनुषंगाने पोलीस तपास करत आहेत.

पीडित मुलीच्या आईने टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी विश्वनाथ आणि माधवला अटक करून पुढील तपास सुरू केला. तपासात ज्या गोष्टींचा खुलासा झाला त्याने पोलीस देखील चक्रावले. कारण या दोन नराधमांनी अनेक मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. आतापर्यंत या संदर्भात चार तक्रारी पोलिसांकडे दाखल झाल्या आहेत.


टिटवाळा येथील एका शाळेसमोर माधव मगर आणि विश्वनाथ तरणे या दोन नराधमांचे समोसा - वडापाव विक्रीचे दुकान आणि चायनिज सेंटर आहे. हे दोघे नराधम शाळेच्यावेळेत लहान मुलींना शाळेच्या परिसरात घेऊन जात आणि त्यांना अश्लिल व्हिडिओ दाखवत. याशिवाय मुलींसोबत अश्लील चाळे देखील करत असत. दरम्यान, एका महिलेला हे नराधम नऊ वर्षाच्या शाळकरी मुलीसोबत गैरप्रकार करत असताना दिसले. त्या महिलेने तातडीने पीडित मुलीच्या आईला याबाबत माहिती दिली. पीडित मुलीच्या आईने मुलीला विश्वासात घेऊन सविस्तर माहिती काढली. त्यावेळी हा सर्व धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली. 
 

Web Title: Sexually exploited by showing obscene videos to minor girls