लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2021 17:50 IST2021-07-25T17:49:29+5:302021-07-25T17:50:14+5:30
Sexual harrasment of a minor girl :जालना शहरातील फुक्टनगर येथील रहिवासी असलेल्या १७ वर्षीय मुलीचे लग्न जानेवारी महिन्यात सिंधी काळेगाव येथील सोनू सय्यद जहीर याच्यासोबत जमले होते.

लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गुन्हा दाखल
जालना : अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून त्याच्यावर वारंवार अत्याचार केल्याची घटना ठाणे येथे घडली. या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून शनिवारी रात्री संशयित आरोपी सोनू सय्यद जहीर (रा. सिंधी काळेगाव ता. जालना, हमु. ठाणे) याच्याविरुध्द कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जालना शहरातील फुक्टनगर येथील रहिवासी असलेल्या १७ वर्षीय मुलीचे लग्न जानेवारी महिन्यात सिंधी काळेगाव येथील सोनू सय्यद जहीर याच्यासोबत जमले होते.
लग्न महिनाभर राहिल्याने दोघेही मोबाईलद्वारे बोलत होते. यामुळे त्यांची मैत्री घट झाली. परंतु, सोनू सय्यद जहीर हा कुठेही नोकरीला नसून, मजुरीचे काम करत असल्याची माहिती मुलीच्या वडिलांना मिळाली. त्यानंतर हे लग्न मोडण्यात आले. परंतु, सोनू सय्यद जहीर व मुलीचे प्रेम संबंध असल्याने ते दोघेही ठाणे येथे निघून गेले. तेथे सोनूने तिला लग्नाचे अमिष दाखवून वारंवार अत्याचार केला. लग्नाचे नाव काढल्यास तो टाळाटाळ करत असल्याने अल्पवयीन मुलगी पुन्हा जालना येथील आई-वडिलांकडे परतली. तिने आई-वडिलांना सांगितले. त्यानंतर अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून सोनू सय्यद जहीर याच्याविरध्द कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला, अशी माहिती पोलिसांनी दिली.