शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

चॉकलेटचे आमिष दाखवून जंगलात तीन बालकांचे लैंगिक शोषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2019 19:55 IST

पोलिसांनी आरोपींविरुद्ध भा.दं.वि. कलम ३७७, ५०६, ३४ व सह कलम ४, ६ पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंदविला.

ठळक मुद्देआरोपी हे तीनही मुलांना चॉकलेट किंवा दुचाकीवर फिरविण्याचा बहाणा करून वडाळी तलावामागील जंगलात नेत होते.बालकांसाठी काम करणाऱ्या चाइल्ड लाइनने गांभीर्य दाखविल्याने ही धक्कादायक घटना उघडकीस आली

 

 

अमरावती - चार महिन्यांपासून तीन बालकांवर लैंगिक अत्याचार केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस चौकशीत उघड झाला. अनैसर्गिक कृत्याच्या या प्रकरणात फ्रेजरपुरा पोलिसांनी तीन आरोपींना शुक्रवारी अटक केली. रवि बबनराव कांबळे (२४), वैभव रामदास मेश्राम (२३, दोन्ही रा. वडाळी) आणि आकाश किशोर ठाकरे (२४, रा. भोईपुरा) अशी आरोपींची नावे आहेत.एका १३ वर्षीय बालकाला जंगलात नेऊन त्याच्यावर पाच जणांनी अनैसर्गिक कृत्य केल्याची तक्रार फ्रेजरपुरा पोलिसांना गुरुवारी प्राप्त झाली. त्यानुसार पोलिसांनी आरोपींविरुद्ध भा.दं.वि. कलम ३७७, ५०६, ३४ व सह कलम ४, ६ पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंदविला. घटनेचे गांभीर्य पाहता, पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू करून तिघांना शुक्रवारी अटक केली, तर दोन अल्पवयीन मुलांना चौकशीकरिता बोलाविले. आरोपी हे तीनही मुलांना चॉकलेट किंवा दुचाकीवर फिरविण्याचा बहाणा करून वडाळी तलावामागील जंगलात नेत होते. तेथे त्यांच्यावर आळीपाळीने जबरीने अनैसर्गिक कृत्य करीत होते, असे पोलिसांच्या चौकशीत पुढे आले आहे. तीनही आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. पोलीस निरीक्षक पंजाब वंजारी यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक बिपीन इंगळे पुढील तपास करीत आहेत.चाइल्ड लाइनने उघड केले लैंगिक शोषण श्री हनुमान व्यायाम प्रसारक मडंळातील चाइल्ड लाइनकडे हे प्रकरण आले होते. तेथील पदाधिकाऱ्यांनी पीडित मुलाच्या घरी जाऊन त्यांना समुपदेशन केले. त्यानंतर बालकांना बालकल्याण समितीसमोर हजर केले. यानंतर पोलिसांत तक्रार नोंदविली गेली. बालकांसाठी काम करणाऱ्या चाइल्ड लाइनने गांभीर्य दाखविल्याने ही धक्कादायक घटना उघडकीस आली असून, शहरात अशाप्रकारे बालकांचे लैंगिक शोषण होत असेल, तर संबंधित व्यक्ती किंवा अन्य कुणीही अशा अमानवी कृत्यांची माहिती चाइल्ड लाइनला द्यावी, असे आवाहन चाइल्ड लाइनचे अजय देशमुख यांनी केले आहे.

टॅग्स :POCSO Actपॉक्सो कायदाsexual harassmentलैंगिक छळAmravatiअमरावतीPoliceपोलिस