परभणीच्या वेदपाठशाळेत अकोल्यातील मुलाचा लैंगीक छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 13:09 IST2018-09-17T13:05:35+5:302018-09-17T13:09:00+5:30

अकोला : परभणी येथील मोंंढा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या एका वेदपाठ शाळेत शिक्षण घेणाºया अकोल्यातील डाबकी रोडवरील रहिवासी एका मुलाचा संस्थाचालकांच्याच नात्यातील मुलांनी लैंगिक छळ केल्याचा प्रकार उजेडात आला आहे.

Sexual harassment of a boy of Akola in Parbhani's Ved school | परभणीच्या वेदपाठशाळेत अकोल्यातील मुलाचा लैंगीक छळ

परभणीच्या वेदपाठशाळेत अकोल्यातील मुलाचा लैंगीक छळ

ठळक मुद्देदोन मुलांच्या गुप्तांगाला धागा बांधने, दोराने उलटे टांगणे यासारखे प्रकार या दोन चिमुकल्यांवर करण्यात आले.नवा मोंढा पोलिस ठाण्यात वेद पाठशाळा चालक सुधीर कुलकर्णी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.सुधीर कुलकर्णी यास अटक करण्यात आली असून तो १८ सपटेंबर पर्यंत पोलिस कोठडीत आहे.

अकोला : परभणी येथील मोंंढा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या एका वेदपाठ शाळेत शिक्षण घेणाºया अकोल्यातील डाबकी रोडवरील रहिवासी एका मुलाचा संस्थाचालकांच्याच नात्यातील मुलांनी लैंगिक छळ केल्याचा प्रकार उजेडात आला आहे. या मुलाला अकोल्यात आणण्यात आले असून राम नगरातील एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
परभणी येथील गणेश वेद पाठशाळेत पौरोहित्याचे शिक्षण घेणाºया दोन मुलांवर शाळेतीलच दोन मुलांनी लैंगिक अत्याचार केल्याचे प्रकरण शुक्रवारी पीडीत मुलांच्या पालकांनी उघडकीस आणले. दोन मुलांच्या गुप्तांगाला धागा बांधने, दोराने उलटे टांगणे यासारखे प्रकार या दोन चिमुकल्यांवर करण्यात आले. त्यानंतर नवा मोंढा पोलिस ठाण्यात वेद पाठशाळा चालक सुधीर कुलकर्णी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल झाल्यानंतर सुधीर कुलकर्णी यास अटक करण्यात आली असून तो १८ सपटेंबर पर्यंत पोलिस कोठडीत आहे. पीडित मुलांपैकी एक मुलगा डाबकी रोड येथील रहिवासी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पतंगाचा मांजा बांधला गुप्तांगाला
मुलांना नग्न करून उलटे टांगणे, चटके देणे ,पाइपने जबर मारहाण करणे, पुष्ठभागावर मारहाण, रात्री मुलाच्या गुप्तांगास पतंगाचा मांजाने बांधून ठेवले होते. त्यानंतर मुलाला लघवीला त्रास झाल्याने संपूर्ण जागा सुजली होती. दुसº्या दिवशी सकाळी मांजा ओढल्याने त्याला प्रचंड दुखपत होऊन रक्तस्त्राव झाला होता, असे घृणास्पद प्रकार करण्यात आल्याची आपबिती पीडित मुलाच्या नातेवाईकांनी सांगितली. हा मुलगा धास्तावलेला असून त्याच्या मनात भीती आहे.

अकोल्यातील तीन मुले
जून महिन्यापासून पिडीत मुलासह अकोलयातील तीघे जन वेदपाठ शाळेत शिकायला आहेत. यामधील पिडीत मुलाच्या कुटुंबीयांना फोन करून प्रकृती ठिक नसल्याने त्याला अकोल्याला न्यावे लागेल, असे सांगितले. त्याला घेण्यासाठी कुटुंबीय गेले असता मुलाला अश्रु अणावर झाले. नंतर त्याने झालेला प्रकार सांगितला. तीन दिवसापासून मुलगा उपाशी असल्याचे त्यांने सांगितले. मुलाच्या पाठीवर आजही व्रण आहेत. या तिघांनाही मारहाण झाल्याचे दिसून येत आहे.पोलिसांनी त्या दोघांचेही बयाण नोंदविले आहे.

 

Web Title: Sexual harassment of a boy of Akola in Parbhani's Ved school