खाजगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाने केले 9 वर्षीय विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 23:36 IST2018-09-10T23:35:23+5:302018-09-10T23:36:22+5:30
पोलिसांनी भा.दं. वि. कलम 354, 506 आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुुन्ह दाखल केला

खाजगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाने केले 9 वर्षीय विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण
मुंबई - शनिवारी सकाळी 10:00 वाजताच्या सुमारास फिर्यादी यांची 9 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही कुर्ला पश्चिम येथील आरोपी लुईस फर्नांडिसच्या(वय 54) खाजगी ट्युशनसाठी गेली असताना आरोपी लुईसने पीडित विद्यार्थिनीच्या छातीवर हात फिरवून तिच्याशी अश्लिल संभाषण केले. तसेच कोणाला काही सांगितले तर तुला सोडणार नाही असे धमकावले. याप्रकरणी विनोबा भावे मार्ग पोलीस ठाण्यात पीडित अल्पवयीन मुलीच्या पालकांनी तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी भा.दं. वि. कलम 354, 506 आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुुन्ह दाखल करण्यात आला.