शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

सुरतमध्ये २५ महिला होमगार्डचा लैंगिक छळ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2018 5:13 AM

तब्बल २५ महिला होमगार्डचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपावरून त्यांचा कमांडिंग आॅफिसर व त्याची महिला सहायक यांना सोमवारी निलंबित करण्यात आले.

सुरत : तब्बल २५ महिला होमगार्डचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपावरून त्यांचा कमांडिंग आॅफिसर व त्याची महिला सहायक यांना सोमवारी निलंबित करण्यात आले. या प्रकरणाचा चौकशी अहवाल आठवडाभरात हाती आल्यानंतर पुढची कारवाई करण्यात येणार आहे.कमांडिंग आॅफिसर सोमनाथ घेरवाल व प्लाटून सार्जंट भावना कंथारिया यांनी आपला शारीरिक, मानसिक व लैंगिक छळ केल्याचा तक्रारवजा अर्ज महिला होमगार्डनी सुरतचे पोलीस आयुक्त सतीश शर्मा यांच्याकडे शुक्रवारी पाठविला होता, तसेच या अर्जाच्या प्रती गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी व गृहराज्यमंत्री प्रदीपसिंह जडेजा यांनाही धाडण्यात आल्या.या आरोपाचे गांभीर्य लक्षात घेऊन होमगार्डचे डेप्युटी कमांडंट वीरेंद्रसिंह राणा यांनी सोमनाथ घेरवाल व भावना कंथारिया यांना निलंबित केले. या २५ महिला होमगार्डपैकी अंजना नायक यांनी सोमनाथ यांच्या विरोधात सुरत शहराचे होमगार्ड कमांड डॉ. प्रफुल्ल शिरोया यांच्याकडे एक वर्षापूर्वीच तक्रार दाखल केली होती. कामावर असताना कशा प्रकारे लैंगिक छळ केला जातो, याचा तपशीलही अंजना नायक यांनी कळविला होता.सांगितली घरकामेअंजना नायक गेल्या नऊ वर्षांपासून सुरतमध्ये होमगार्ड म्हणून काम करीत आहेत. सोमनाथ घेरवाल हा एकटाच राहत असून, त्याने एकदा तिला घरी बोलावून तेथील काही कामे करायला सांगितली. घरकामाला नकार देताच घेरवालने अंजना यांची बदली त्यांच्या घरापासून दूरच्या ठिकाणी केली.अंजनाने लैंगिक छळासंदर्भात सुरत शहराच्या होमगार्ड कमांडंटकडे ८ सप्टेंबरला तक्रार केली; मात्र त्यानंतरही सोमनाथ घेरवालवर काहीही कारवाई झाली नाही. त्यामुळे महिला होमगार्डमध्ये असंतोष निर्माण झाला होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीGujaratगुजरात