पोलीस अकादमीत मुलींचे लैगिक शोषण; रेल्वे पोलीसांमधील दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 07:54 PM2023-08-10T19:54:55+5:302023-08-10T19:55:07+5:30

आरोपी समाधान गावडे (२८) आणि त्याची २५ वर्षीय मैत्रीण वसई रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.

Sexual abuse of girls in police academy; Two of the railway police were arrested | पोलीस अकादमीत मुलींचे लैगिक शोषण; रेल्वे पोलीसांमधील दोघांना अटक

पोलीस अकादमीत मुलींचे लैगिक शोषण; रेल्वे पोलीसांमधील दोघांना अटक

googlenewsNext

-मंगेश कराळे

नालासोपारा:- पोलिसाकडूनच अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार नालासोपाऱ्यात उघडकीस आला आहे. आरोपी पोलीस नालासोपारा येथे पोलीस भरती प्रशिक्षणाचे क्लासेस चालवत होता. दोन पीडित मुलींनी पोलीस ठाण्यात तक्रार देऊन आरोपी पोलीस आणि त्याच्या मैत्रिणीविरोधात विनयभंग तसेच पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

आरोपी समाधान गावडे (२८) आणि त्याची २५ वर्षीय मैत्रीण वसई रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. गावडे हा नालासोपारा येथे विजयी भव नावाची पोलीस अकादमी चालवतो. त्याच्यावर क्लासेला येणार्‍या मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी दोन पीडित मुलींनी नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आरोपी गावडे हा मुलींना अश्लील मेसेजेस पाठवता होता तसेच व्हिडियो कॉल करून अश्लील कृत्य करत होता.

शिकविण्याच्या नावाखाली तो या मुलींच्या शरिराला हेतुपूरस्सर चुकीच्या ठिकाणी हात लावत होता. अनेकदा मुलींना पाठलाग करत त्यांच्या घरी जायचा तसेच त्यांना फिरायला बोलवत होता. त्याच्या मैत्रिणीने या कृत्याला पाठिंबा दिल्याचा आरोप आहे. तिने एका पीडित मुलीचे व्हॉटसप स्कॅन करून आरोपी गावडे बरोबर आक्षेपार्ह संभाषण केले होते. या प्रकारामुळे पीडित मुलींनी क्लासमध्ये जाणे बंद केेले.

पीडित मुलींनी मानसिक त्रास झाल्याने त्यांनी आपल्या कुटुंबियांना हा प्रकार सांगितला. बुधवारी नालासोपारा पोलीस ठाण्यात आरोपी पोलीस समाधान गावडे आणि त्याची मैत्रीण या दोघांविरोधात विनयभंग, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०२२ च्या (पोक्सो) तसेच माहिती तंत्रज्ञान (सुधारणा) अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

१) पीडित मुलींच्या जबाबानंतर आरोपींवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. गुरूवारी त्यांना न्यायालयात हजर केल्यावर दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. - विलास सुपे, (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नालासोपारा पोलीस ठाणे)

Web Title: Sexual abuse of girls in police academy; Two of the railway police were arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.