The sex racket was running under the name of spa cum parlor | स्पा कम पार्लरच्या नावाखाली सुरु होते सेक्स रॅकेट

स्पा कम पार्लरच्या नावाखाली सुरु होते सेक्स रॅकेट

ठळक मुद्देया कारवाईत पश्चिम बंगाल पोलिसांनी १६ महिलांना आणि एका पुरुषाला अटक केली आहे.स्पा सेंटर कम पार्लरच्या नावाखाली सेक्स रॅकेट सुरु असल्याच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

कोलकात - पश्चिम बंगाल येथील दुर्गापूर शहरात सुरु असलेल्या सेक्स रॅकेटपोलिसांनी उध्वस्त केले आहे. स्पा सेंटर आणि ब्युटी पार्लरमध्ये हे सर्रास सेक्स रॅकेट सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार छापा टाकून या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पश्चिम बंगाल पोलिसांनी १६ महिलांना आणि एका पुरुषाला अटक केली आहे. दुर्गापूर येथे पोलिसांनी टाकलेल्या छाप्यादरम्यान घटनास्थळावरुन पोलिसांनी काही कागदपत्रे आणि इतर साहित्य देखील जप्त केली आहेत.

पश्चिम बर्दवान जिल्ह्यात सेक्स रॅकेट सुरु असल्याची गुप्त माहिती कोलकाता पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे शनिवारी रात्री पोलिसांनी एक तोतया ग्राहक या स्पा सेंटरमध्ये पाठविण्यात आला. यानंतर तोतया ग्राहकाने पोलिसांना इशारा करताच पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. घटनास्थळावरुन एका पुरुषाला आणि १६ महिलांना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणी स्पा कम पार्लरच्या मालकावर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे. स्पा सेंटर कम पार्लरच्या नावाखाली सेक्स रॅकेट सुरु असल्याच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर शहरातील अन्य स्पा सेंटरवर पोलीस कडक नजर ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: The sex racket was running under the name of spa cum parlor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.