प्रसिद्ध हॉटेलमध्ये सुरु होते सेक्स रॅकेट; तरुण - तरुणी आढळले आक्षेपार्ह स्थितीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2021 19:28 IST2021-07-11T19:28:06+5:302021-07-11T19:28:32+5:30

Sex Racket : ग्रेटर नोएडा येथील ओयो हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती समोर आली होती.

Sex racket starts in famous hotel; Young - Young women found in an offensive position | प्रसिद्ध हॉटेलमध्ये सुरु होते सेक्स रॅकेट; तरुण - तरुणी आढळले आक्षेपार्ह स्थितीत

प्रसिद्ध हॉटेलमध्ये सुरु होते सेक्स रॅकेट; तरुण - तरुणी आढळले आक्षेपार्ह स्थितीत

ठळक मुद्दे कारवाई करीत पोलिसांनी ओयो हॉटेलवर छापेमारी केली. यामध्ये तिघांना अटक करण्यात आली आहे. 

दिल्ली - देशात सेक्स रॅकेटचा सुळसुळाट असताना त्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून विशेष प्रयत्न केले जात आहे. कोरोना काळात अनेक ठिकाणी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. दरम्यान ग्रेटर नोएडा येथील ओयो हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती समोर आली होती. त्यानुसार कारवाई करीत पोलिसांनी ओयो हॉटेलवर छापेमारी केली. यामध्ये तिघांना अटक करण्यात आली आहे. 

या प्रकरणात पोलिसांनी हॉटेलचे मालक ऋषी गोयलला अटक केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ग्रेटर नोएडाच्या सेक्टर ३६ मधील ग्रेनो कॉम्प्लेक्सच्या तिसऱ्या मजल्यावर ओयो हॉटेल सुरू होतं. शनिवारी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी ओयो हॉटेलमध्ये छापा टाकला. त्यावेळी दोन तरुण आणि एका तरुणीला अटक करण्यात आलं आहे. ताब्यात घेण्यात आलेला एक तरुण ग्रेटर नोएडाचा राहणारा असून दुसरा बुलंदशहरमधील सिंकदराबाद येथे राहतो. यांच्याकडून ४ मोबाइल फोन ६ हजार ६०० रुपयांची रोकड, दोन डिवीआर, रजिस्टर, ग्राहक फॉर्म आणि आपत्तीजनक साहित्य जप्त करण्यात आलं. 

ओयो हॉलेटचा मालक ऋषी गोयल यालाही ताब्यात घेण्यात आलं असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. काही तरुण-तरुणी आक्षेपार्ह अवस्थेत सापडले आहेत. काही दिवसांपूर्वी नोएडामधील बेकायदेशीर गेस्ट हाऊसमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला होता, अशी माहिती न्यूज १८ लोकमतने दिली आहे. 

Web Title: Sex racket starts in famous hotel; Young - Young women found in an offensive position