मंगळवार पेठेतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 12:01 PM2019-03-18T12:01:59+5:302019-03-18T12:06:22+5:30

मंगळवार पेठेतील हॉटेल सूर्या लॉज येथे वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती समर्थ पोलिसांना मिळाली़.

Sex racket open by police on Tuesday | मंगळवार पेठेतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश 

मंगळवार पेठेतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश 

googlenewsNext
ठळक मुद्देतिघांना अटक , तीन तरुणींची सुटका

पुणे : मंगळवार पेठेतील हॉटेल सूर्या येथे पोलिसांनी छापा घालून तेथे सुरु असलेला वेश्या व्यवसाय उघडकीस आणला आहे. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी तिघांना अटक केली आहे़. तसेच तीन तरुणींची सुटका केली आहे.
व्यंकट विष्णु कदम (रा़. लोहगाव), परमेश्वर विश्रंभर सोळंकी (वय २४, रा़ निलंगा, लातूर) आणि रवींद्र दामोदर बुरकुल (वय २६, रा़ देऊळगाव राजा, बुलढाणा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़ एजंट कार्तिक बी, मंकेश बी, केशव शर्मा उर्फ दीपक केसव व्यंकट, नवलकिशोर बागमल अगरवाल (रा़ बाणेर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवार पेठेतील हॉटेल सूर्या लॉज येथे वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती समर्थ पोलिसांना मिळाली़. त्यावरुन पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली़ . त्यानंतर शनिवारी रात्री या लॉजवर छापा घातला. तेथील तीन तरुणींची सुटका केली़ त्यात मुंबईच्या २ आणि कर्नाटकमधील एका तरुणीचा समावेश आहे.

Web Title: Sex racket open by police on Tuesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.