शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
3
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
4
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
5
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
6
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
7
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
8
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
9
त्या दहशतवादी महिला डॉक्टरचा माजी पती म्हणतो... ती प्रेमळ आई
10
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र
11
एमसीएच्या निवडणुकीमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांची बाजी, उपाध्यक्षपदी १३६ मतांनी विजय; अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
12
‘ओंकार’ जाणार वनतारामध्ये, सर्किट बेंचचा निर्णय, मूळ याचिका कायम
13
तुर्कीयेचे लष्करी मालवाहतूक विमान कोसळले; २० ठार
14
रोहित शर्मा ७ वर्षांनंतर खेळणार विजय हजारे करंडक, विराटबाबत संभ्रम
15
जुरेल घेणार रेड्डीचे स्थान, पहिल्या कसोटीत ऋषभ पंतही खेळणार, अक्षर पटेलला अंतिम संघात संधी
16
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
17
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
18
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
19
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
20
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा

नागपूरच्या आठ बडतर्फ पोलिसांना सात वर्षांची सक्तमजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 00:25 IST

या सर्वांना सत्र न्यायालयाने भादंवि कलम ३३० अन्वये तीन वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा दिली होती. उच्च न्यायालयानेही ती कायम केली होती. ही शिक्षा वाढवावी यासाठी राज्य सरकारने केलेले अपील मंजूर करून हा निकाल दिला.

मुंबई : रेल्वेत खलाशी म्हणून नोकरी करणाऱ्या जॉयनस अ‍ॅडम येल्लामती या ४२ वर्षांच्या इसमास त्याने न केलेल्या चोरीच्या गुन्ह्याची कबुली घेण्यासाठी कोठडीत कोंडून बेदम मारहाण केल्याच्या २५ वर्षांपूर्वीच्या प्रकरणात नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेतील आठ माजी पोलिसांना सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी प्रत्येकी सात वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.या सर्वांना सत्र न्यायालयाने भादंवि कलम ३३० अन्वये तीन वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा दिली होती. उच्च न्यायालयानेही ती कायम केली होती. ही शिक्षा वाढवावी यासाठी राज्य सरकारने केलेले अपील मंजूर करून हा निकाल दिला. जॉयनस याचा कोठडीत मारहाण करून खून करणे (कलम ३०२), त्याच्या पत्नीचा विनयभंग करणे (कलम ३५४) व त्याच्या पत्नीसह इतर कुटुंबियांना डांबून ठेवणे (कलम ३४२) या गुन्ह्यांतून या सर्वांना निर्दोष ठरविण्याचा उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवला गेला.सात वर्षांचा सश्रम कारावास झाला त्यांची नावे अशी: सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत कराडे (सध्याचे वय ६३ वर्षे), उपनिरीक्षक रामभाऊ कडू (६४) आणि झहिरुद्दीन देशमुख (६६), नीलकंठ चोरपगार (६१), नामदेव गणेशकर (६४), रमेश भोयर (५४), अशोक शुक्ला (५०) व सुधाकर ठाकरे (४९).गुन्हा करताना हे सर्वजण नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेत नियुक्तीवर होते. खटला दाखल झाल्यावर त्यांना प्रथम निलंबित व शिक्षा झाल्यावर बडतर्फ केले गेले. आठपैकी पाच आरोपींची निवृत्तीची वयेही उलटून गेली आहेत. तीन वर्षांचा कारावास भोगून हे सर्व सुटले होते. आता त्यांना वाढीव शिक्षा भोगण्यासाठी पुन्हा तुरुंगात जावे लागेल.काय होते प्रकरण?इंडिया सन हॉटेलमध्ये राहात असताना आपल्या चीजवस्तू लुटण्यात आल्या, अशी माहिती गणेशप्रसाद, अरुणकुमार व काशिरामनी देवलापूर ठाण्याचे पोलीस जमादार माधवराव तेलगुडिया यांना २३ जून १९९३ रोजी दिली. तेलगुडिया तिघांना घेऊन पोलीस निरीक्षक नरुलेंकडे आले. त्या रात्री गस्त घालताना संशयिताचा शोध घेण्याचे ठरले. सुरुवातीस ही चोरी अँथनी नावाच्या व्यक्तीने केल्याचा कयास होता. गस्ती पथक मध्यरात्रीनंतर येल्लामती यांच्या घरी पोहोचले. येल्लामती गाढ झोपले होते. पोलिसांनी त्यांना घरातून बाहेर खेचले व मारहाण केली. नंतर त्यांना पोलीस ठाण्यात आणून नग्न करून बेदम मारहाण केली. दुसºया दिवशी त्यांचा मृत्यू झाला.

टॅग्स :Policeपोलिस