शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

सहायक पोलीस निरीक्षकासह सात कर्मचारी निलंबित 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2020 10:53 PM

crime news: गुटखा भोवला : एलसीबीच्या पाच जणांचा समावेश

जळगाव : मेहुणबारे पोलीस ठाण्याच्या हद्दीत पकडलेला ६० लाखाच्या गुटखा प्रकरणात मेहुणबारे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन बेंद्रे यांच्यासह सात पोलीस कर्मचाऱ्यांना बुधवारी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे निलंबित केले आहे. ही माहिती मुंढे यांनी लोकमतला दिली.

यात एलसीबीच्या पाच, मेहुणबारे पोलीस स्टेशनचा एक व मुख्यालयाचा एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे. मेहुणबारे पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक सचिन बेंद्रे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फौजदार नारायण पाटील, हवालदार रामचंद्र बोरसे, प्रवीण हिवराळे, महेश पाटील, मनोज दुसाने, मुख्यालयाचा नटवर जाधव व मेहुणबारे पोलीस ठाण्याचा रमेश पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे.

हे प्रकरण घडल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी चाळीसगाव परिमंडळाचे अपर पोलीस अधीक्षक सचिन गोरे यांच्याकडे चौकशी सोपविली होती. गोरे यांनी गेल्या आठवड्यात या सर्वांचे लेखी जबाब नोंदविले होते. हा चौकशी अहवाल बुधवारी पोलीस अधीक्षक यांच्याकडे आला. त्यात ठपका ठेवण्यात आलेल्या सहायक निरीक्षक बेंद्रे यांच्यासह सात कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले.  काय आहे प्रकरणसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडे सात वाजता चाळीसगाव-मेहुणबारे रस्त्यावरील गिरणा नदीच्या पुलावर ५७ लाख रुपये किमतीचा गुटख्याचा ट्रक (क्र.एम.एच.१८ एम.०५५३) पकडण्यात आला होता. तोडीपाणी करुन हा ट्रक पोलिसांनी सोडून दिल्याचा आरोप चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केला होता. या प्रकरणात ट्रक चालक मसूद अहमद शब्बीर अहमद (३८) व क्लिनर मोहम्मद अय्युब दिन मोहम्मद (५०) दोन्ही रा. मालेगाव यांना अटक केली होती.

गुटखा प्रकरणात सहभाग घेतलेल्या मेहुणबारे अधिकारी, कर्मचारी तसेच एलसीबीच्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. चौकशीत ते दोषी आढळून आले आहेत. चुकीचे काम करणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही.-डॉ. प्रवीण मुंढे, पोलीस अधीक्षक

टॅग्स :Policeपोलिस