वांद्रेमध्ये नोकराने मारला लाखोंच्या ऐवजावर डल्ला, रोख रक्कम, दागिन्यांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 11:06 IST2023-06-20T11:06:18+5:302023-06-20T11:06:32+5:30

नोकराचे नाव सुनील कुमार असे असून १८ जूनला हा प्रकार उघडकीस आला. 

Servant loot lakhs of rupees in Bandra, including cash, jewellery | वांद्रेमध्ये नोकराने मारला लाखोंच्या ऐवजावर डल्ला, रोख रक्कम, दागिन्यांचा समावेश

वांद्रेमध्ये नोकराने मारला लाखोंच्या ऐवजावर डल्ला, रोख रक्कम, दागिन्यांचा समावेश

मुंबई : वांद्रे पोलिसांच्या हद्दीत राहणाऱ्या शिवानी भाटिया (७०) यांच्या घरी काम करणाऱ्या नोकराने घरातील दागिने आणि रक्कम मिळून जवळपास ४ लाख ६० हजारांचा डल्ला मारला. या  नोकराचे नाव सुनील कुमार असे असून १८ जूनला हा प्रकार उघडकीस आला. 

भाटिया यांच्या म्हणण्यानुसार त्या सकाळी साडेआठच्या सुमारास चंद्रशेखर यांच्यासोबत टीव्ही पाहण्यासाठी बेडरूममध्ये गेल्या तेव्हा त्यांना ड्रेसिंग टेबलवर ठेवत असलेली कपाटाची चावी बेडवर दिसली. त्यामुळे संशय बळावला आणि त्यांनी कपाटातील लॉकर उघडून पाहिले तेव्हा त्यातील एक लाख वीस हजार रुपये आणि सोन्याचे दागिने गायब होते.

याबाबत विचारणा करण्यासाठी त्यांनी सुनील कुमारला आवाज दिला मात्र तो घरात नव्हता तेव्हा त्याला मोबाइलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते दोन्ही नंबर नॉट रिचेबल होते. त्यावरून सुनीलने चोरी केल्याचे लक्षात आले आणि भाटिया यांनी वांद्रे पोलिसांना जाऊन त्यांनी गुन्हा दाखल केला. 

Web Title: Servant loot lakhs of rupees in Bandra, including cash, jewellery