शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

नोकराने मालकाचा केला विश्वासघात; लंपास केले दागिने आणि रोकड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 21:35 IST

पोलिसांनी एक किलो ९२३ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

ठळक मुद्देचोरी करून पळालेल्या नोकराला गुन्हे शाखेच्या कक्ष - १० च्या पोलिसांनी अटक केली संदीप दाऊजी शर्मा (३२) असे अटक आरोपीचे नाव आहे.सोन्याच्या व्यावसायिकाकडे काम करणाऱ्या आरोपीने त्यांचा व त्यांच्या कुटुंबाचा विश्वास संपादन केला.

मुंबई - सोने व्यापाऱ्याचा विश्वासाचा गैरफायदा घेत लाखोंचे दागिने आणि रोकड चोरी करून पळालेल्या नोकराला गुन्हे शाखेच्या कक्ष - १० च्या पोलिसांनीअटक केली आहे. संदीप दाऊजी शर्मा (३२) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी एक किलो ९२३ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

अंधेरी पूर्वेकडील एमआयडीसी येथे राहणाऱ्या सोन्याच्या व्यावसायिकाकडे काम करणाऱ्या आरोपीने त्यांचा व त्यांच्या कुटुंबाचा विश्वास संपादन केला. तसेच त्याने त्यांची विश्वास संपादन करण्यासाठी दिन मोहम्मद असे नाव बदलले. २७ ऑक्टोबर २०१२ रोजी व्यावसायिकाच्या नातेवाईकाचा मृत्यू झाल्याने ते सोलापूर येथे गेले.  तर इतर कुटुंबीय बकरी ईदसाठी गोवंडी येथे गेले होते. त्यावेळी व्यावसायिकाच्या पत्नीने आरोपीला एमआयडीसी येथील बंद घराची चावी देत त्याला कुराण आणण्यास सांगितले. त्यावेळी आरोपीने याच संधीचा फायदा घेत घरातील रोख तीन लाख रुपये व सोने व हिऱ्यांचे एकूण ६८ लाख २० हजार रुपये किंमतीचे दागिने चोरून पळ काढला. नोकराने केलेल्या चोरीचा उलघडा झाल्यानंतर या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, आरोपीचा शोध लागत नव्हता. त्याने आपली ओळख लपवून तो उत्तर प्रदेश, मथुरा अशा ठिकाणी राहत होता. दरम्यान, या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेच्या कक्ष- १० च्या पोलिसांकजे वर्ग केल्यानंतर पोलीस पथकाने त्याचा शोध घेण्यासाठी सुरुवात केली. अशातच आरोपी सोन्याची विक्री करण्यासाठी विलेपार्ले परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.

टॅग्स :ArrestअटकMumbaiमुंबईPoliceपोलिसRobberyचोरी