विकृतीचा कळस गाठला! 120 महिलांना न्यूड फोटो पाठविले; 54 वर्षांच्या व्यक्तीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2020 04:31 PM2020-11-08T16:31:07+5:302020-11-08T16:32:36+5:30

Crime News: ओळखत नसलेल्या नंबरवरही त्याने फोटो पाठविल्याचे सांगितले. चल्लकेरेमध्येच त्याने जवळपास 50 महिलांना न्यूड फोटो पाठविल्याचे समोर आले आहे.

Sent nude photos to 120 womens; 54-year-old man arrested in Karnataka | विकृतीचा कळस गाठला! 120 महिलांना न्यूड फोटो पाठविले; 54 वर्षांच्या व्यक्तीला अटक

विकृतीचा कळस गाठला! 120 महिलांना न्यूड फोटो पाठविले; 54 वर्षांच्या व्यक्तीला अटक

Next

कर्नाटक पोलिसांनी शुक्रवारी एका 54 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. गेल्या सहा महिन्यांत या विकृताने 120 महिलांसह 200 हून अधिक लोकांना स्वत:चे न्यूड फोटो पाठविल्याचा आरोप आहे. 


चित्रदूर्गच्या चल्लकेरेमध्ये 54 वर्षीय रामकृष्ण यांनी कथितरित्या सहा महिन्यांच्या काळात 120 महिलांना न्यूड फोटो पाठविले आहेत. एका आठवड्यातच काही लोकांनी पोलिसांकडे तक्रार केली होती, की त्यांना एका अज्ञात नंबरवरून अश्लिल फोटो पाठविले जात आहेत. 'द न्यूज मिनट' ने दिलेल्या वृत्तानुसार पोलिसांनी सांगितले की, तक्रारी आल्यानंतर आरोपीचा शोध सुरु झाला. त्याचा मोबाईल नंबर ट्रॅक केला गेला. यानंतर शुक्रवारी त्याला चल्लकेरे येथील घरातून अटक करण्यात आली. 


पोलिसांनी केलेल्या चौकशीत रामकृष्णने अश्लिल फोटो पाठविल्याचे कबूल केले आहे. आपण ओळखत नसलेल्या नंबरवरही त्याने फोटो पाठविल्याचे सांगितले. चल्लकेरेमध्येच त्याने जवळपास 50 महिलांना न्यूड फोटो पाठविल्याचे समोर आले आहे. या महिलांना तो ओळखतही नव्हता. एवढेच नाही तर काही महिलांकडे तो त्यांचे फोटोही मागत होता, असे समोर आले आहे. 


रामकृष्णला चित्रदुर्गच्या न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. त्याला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. 

गोव्यातही गेल्या आठवडाभरापासून खळबळ
गेल्या काही दिवसांपासून गोव्यामध्ये न्यूड फोटोशूटमुळे वातावरण तापलेले आहे. पूनम पांडे हिच्या गोव्यात शूट झालेल्या सॉफ्ट पॉर्न व्हिडिओमुळे राज्याची प्रतिमा मालिन झालेली असतानाच सिनेस्टार आणि मॉडेल मिलिंद सोमण याचा गोव्यातील बिचवर विवस्त्र धावतानाचा फोटो त्याच्या इन्स्टाग्रामवर झळकल्याने गोव्याचे नाव पुन्हा एकदा कुचर्चेत आले आहे. मिलिंद सोमण याने आपल्या 55 व्या वाढदिनी हा फोटो इन्स्टाग्रामवर टाकला असून विवस्त्रावस्थेत धावतानाचा फोटो त्याची पत्नी अंकिता कुवर हिने शूट केला आहे.

लक्ष्मण झुल्यावर न्यूड व्हिडिओ
तर काही महिन्यांपूर्वी उत्तराखंडमधील ऋषिकेश येथील गंगा नदीवरील लोकप्रिय लक्ष्मण झुल्यावर न्यूड व्हिडिओ बनवण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी एका फ्रेंच युवतीला अटक केली होती. या विदेशी युवतीला काही अटींवर जामीन मिळाला आहे. रिपोर्टनुसार, एक २७ वर्षीय विदेशी युवती ऋषिकेश येथील लक्ष्मण लक्ष्मण झुल्यावर न्यूड व्हिडिओ शूट करत होती. याप्रकरणी येथील स्थानिक नगरसेवक गजेंद्र सजवान यांनी २५ ऑगस्ट रोजी या युवतीविरोधात तक्रार दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ऋषिकेशमधील मुनी की रेती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ उपनिरीक्षक आर. के. सैनी म्हणाले की, "सजवान यांनी तक्रार केली होती की, एक महिला न्यूड व्हिडिओ व फोटो शूट करत होती." सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना ही माहिती मिळाल्याचे नगरसेवक म्हणाले होते.

Web Title: Sent nude photos to 120 womens; 54-year-old man arrested in Karnataka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.