खळबळजनक! तरुणाची दगडाने ठेचून धारदार हत्याराने वार करून हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2019 17:43 IST2019-10-29T17:36:49+5:302019-10-29T17:43:27+5:30
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली होती.

खळबळजनक! तरुणाची दगडाने ठेचून धारदार हत्याराने वार करून हत्या
अकोले - तालुक्यातील नवलेवाडी येथील प्रथमेश एकनाथ भोसले या १८ वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून, धारदार हत्याराने डोक्यावर वार करून हत्या झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी गर्दनी शिवारातील चिमनदारा भागात घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली होती.
सोमवारी सायंकाळी ४ ते ६ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पोलीस पाटील संतोष अभंग यांचे खबरीवरून अकोले पोलिसांत प्रथम अकस्मात मृत्यूची नोंद झाली. मंगळवारी शवविच्छेदन करण्यात आले तेव्हा मयताचे डोके दगडाने ठेचल्याचे व तीक्ष्ण हत्याराने वार केल्याचे लक्षात आल्यावर मंगळवारी दुपारनंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रथमेश हा बारावी इयत्तेत शिकत होता. नांदेड येथे त्याने सीईटी चे क्लासेस लावले होते.सुट्टीला तो गावी आला होता. हत्येमागील नेमके करण समजू शकले नाही. प्रथमेश याचे मूळ गाव तालुक्यातील पिंपळगाव निपाणी असून त्याचे वडील एकदरा आश्रम शाळेत नोकरीला आहेत.