Breaking : खळबळजनक! मित्राच्या गुप्तांगाला दिले चटके, पैज लावण्यातून घडला प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2020 19:50 IST2020-03-11T19:40:02+5:302020-03-11T19:50:18+5:30
वैद्यकीय तपासणी करून आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु

Breaking : खळबळजनक! मित्राच्या गुप्तांगाला दिले चटके, पैज लावण्यातून घडला प्रकार
नवी मुंबई - दारूच्या नशेत मित्राच्या गुप्तांगाला चटके दिल्याच्या खळबळजनक प्रकार नवी मुंबईत घडला आहे. रबाळे एमआयडीसी परिसरातील ही घटना आहे. रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. काल रंगपंचमीनंतर एकत्र दारू प्यायला बसले असता पैज लावण्यातून हा धक्कादायक प्रकार घडला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. काल रंगपंचमीनंतर चार ते पाचजण दारूची पार्टी करत होते. त्यावेळी दोघांनी काडीपेटीने एकाच्या गुप्तांगाला चटके दिले. त्यानंतर पीडित मुलाच्या गुप्तांगाला जखम झाल्यानंतर आज सकाळी रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी पीडित मुलगा आला. त्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करून आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांनी लोकमतला माहिती दिली.