खळबळजनक! पोलीस ठाण्याच्या आवारात आत्महत्येचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 20:24 IST2019-10-01T20:18:07+5:302019-10-01T20:24:12+5:30
त्याने आत्महत्येसारखे शेवटचे पाऊल कोणत्या कारणास्तव उचलले याचा तपास पोलीस करीत आहेत.

खळबळजनक! पोलीस ठाण्याच्या आवारात आत्महत्येचा प्रयत्न
मुंबई - शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या आवारात व्यक्तीने पेटवून घेतले आहे. गोवंडी, बैंगणवाडी येथील शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या आवारात आज दुपारी ही घटना घडली. त्यामुळे पोलीस ठाण्याच्या परिसरात खळबळ माजली होती. रिजवान अब्दुल स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून जाळून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची ही घटना घडली. हमिद जमादार (४४) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांचे नाव असून पोलिसांनी त्याला उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल केले आहे. रिजवान अब्दूल हमीद जमादार हा बैंगणवाडी येथे राहणार आहे. त्याची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. त्याने आत्महत्येसारखे शेवटचे पाऊल कोणत्या कारणास्तव उचलले याचा तपास पोलीस करीत आहेत.