शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

खळबळजनक! सलमान खानला संपवण्यासाठी 30 लाखांची सुपारी; शार्प शूटरची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2020 11:51 AM

पोलिस चौकशीमध्ये रवीने मोठमोठे खुलासे केले आहेत. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याच्या कार्यालयातून रवीने 8 कोटी रुपये लुटले होते. यानंतरचा खुलासा सलमान खानची आणि त्याच्या शेराची झोप उडविणारा आहे.

ठळक मुद्देमागिल आठवड्यात कंकरखेडामध्ये दीड लाखांचा इनाम असलेल्या शिव शक्ती नायडूला एन्काऊंटरमध्ये मारण्यात आले. पोलिसांवर त्याच्या माणसांनी गोळीबार केला. प्रत्युत्तरात रवीच्या पायाला गोळी लागली. पोलिस चौकशीमध्ये रवीने मोठमोठे खुलासे केले आहेत. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याच्या कार्यालयातून रवीने 8 कोटी रुपये लुटले होते.

मेरठ : उत्तर प्रदेश पोलिसांच्या एन्काऊन्टरमध्ये अटक झालेल्या शक्ती नायडू गँगच्या शार्प शूटरने खळबळजणक खुलासा केला आहे. सर्वांच्या गळ्यातील ताईत असलेला प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याला मारण्यासाठी 30 लाखांची सुपारी घेतल्याची कबुली रवी भूरा याने पोलिसांना चौकशीवेळी दिली आहे. जानेवारी 2018 मध्ये जोधपूर न्यायालयात हजर झालेल्या सलमानला संपविण्यात येणार होते, असा धक्कादयक खुलासा करण्यात आला आहे. 

मागिल आठवड्यात कंकरखेडामध्ये दीड लाखांचा इनाम असलेल्या शिव शक्ती नायडूला एन्काऊंटरमध्ये मारण्यात आले. मात्र, त्याचा साथीदार रवी मलिक उर्फ भूरा तेथून निसटला होता. रवी हा मुझफ्फरनगरच्या रायशी येथील राहणारा आहे. मात्र, तो दिल्लीमध्ये स्थायिक झाला होता. शुक्रवारी तो पुष्प विहारमध्ये असल्याचे पोलिसांना समजले होते. पोलिसांनी घेराव घालताच तो रेल्वे रोडच्या दिशेने पळून जाऊ लागला. तसेच पोलिसांवर त्याच्या माणसांनी गोळीबार केला. प्रत्युत्तरात रवीच्या पायाला गोळी लागली. मात्र, त्याच्यासोबतचे साथीदार पिंटू बंगाली आणि नितीन सैदपुरिया पळून गेले. रवी जखमी झाल्याने पोलिसांच्या हाती लागला. 

पोलिस चौकशीमध्ये रवीने मोठमोठे खुलासे केले आहेत. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याच्या कार्यालयातून रवीने 8 कोटी रुपये लुटले होते. यानंतरचा खुलासा सलमान खानची आणि त्याच्या शेराची झोप उडविणारा आहे. रवीने राजस्थानचा गँगस्टर संपत नेहरासोबत मिळून सलमान खानला कायमचे संपविण्याची सुपारी घेतली होती. हे केवळ तो 30 लाखांत करणार होता. 5 जानेवारी 2018 मध्ये काळवीट प्रकरणात सलमान खान न्यायालयात हजर राहणार होता. तेव्हा सलमानला मारण्याची धमकी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याने दिली होती. आता रवीच्या दाव्यामुळे याचीही चौकशी केली जाणार असल्याचे पुलिस महासंचालक प्रशांत कुमार यांनी सांगितले. 

महत्वाचे म्हणजे संपत नेहरावर पाच लाखांचे बक्षिस होते. त्याला हैदराबाद पोलिसांनी अटक केली आहे. सध्या संपत तिहार जेलमध्ये आहे. 

दिल्लीचा एसीपीही निशाण्य़ावर30 जानेवारीला या गँगचे काही जण मेरठच्या वैष्णो धामचे इन्स्पेक्टर विपीन आणि प्रॉपर्टी डीलरची हत्या करण्यासाठी आले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना दिल्लीचे एसीपी ललित मोहन नेगी यांना संपवायचे होते. नेगी यांनी शिव शक्तीवर मोक्का लावला होता. नेगी परतापूरमध्ये एका लग्न समारंभाला आले होते. मात्र, गँगचा एक सदस्य आणि नेगी यांचा पुतण्या असलेल्या तिलकराजने नेगी यांना मारण्यास नकार दर्शविला. यामुळे त्याची हत्या करण्यात आली. 

टॅग्स :Salman Khanसलमान खानRajasthanराजस्थानMurderखूनUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसbollywoodबॉलिवूडShilpa Shettyशिल्पा शेट्टीRaj Kundraराज कुंद्रा