Sensational revelation; Underworld don Dawood's aide was selling drugs with terror funding | खळबळजनक खुलासा; अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचे हस्तक ड्रग्स विकून करत होते टेरर फंडिंग

खळबळजनक खुलासा; अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचे हस्तक ड्रग्स विकून करत होते टेरर फंडिंग

ठळक मुद्देदाऊदचे हस्तक मुंबईत गेल्या काही दिवसांपासून ड्रग्स विकून ते पैसे दाऊदला पाठवत होते.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे हस्तक मुंबईत ड्रग्स विकून टेरर फंडिंग करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एनसीबीच्या पथकाने अटक केलेल्या गँगस्टर चिंकू पठाण याच्या चौकशीतून ही खळबळजनक माहिती समोर आली आहे. गेल्या ५ वर्षांत तब्बल १५०० कोटींचे ड्रग्स विकले गेल्याचं त्याच्या चौकशीतून उघड झाले आहे. 

एनसीबीने गेल्या काही महिन्यांपासून मुंबईत अमली पदार्थ तस्करी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. याच कारवाईदरम्यान, एनसीबीने गँगस्टर चिंकू पठाणला अटक केली. त्याच्याकडे सापडलेल्या डायरीमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

दाऊदचे हस्तक मुंबईत गेल्या काही दिवसांपासून ड्रग्स विकून ते पैसे दाऊदला पाठवत होते. हवाला मार्गे हा पैसा मुंबईबाहेर पाठवला जात होता. गेल्या ५ वर्षांमध्ये या तस्कारांनी १५०० कोटींचे ड्रग्स विकले होते, हा पैसा दाऊदकडे पोहोचल्यानंतर तो दहशतवाद्यांना कारवाया करण्यासाठी पुरवत होता, अशी खळबळजनक माहिती उघड झाली आहे.

Web Title: Sensational revelation; Underworld don Dawood's aide was selling drugs with terror funding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.