खळबळजनक! वेश्यावस्तीत टॅक्सी नेण्यास नकार दिला; आरपीएफ जवानाने चालकावरच केला 'अत्याचार'
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 17:25 IST2020-01-13T17:23:24+5:302020-01-13T17:25:16+5:30
या प्रकरणाची दखल घेत रेल्वे प्रशासनाने आरोपी जवान अमितला तडकाफडकी निलंबित केले आहे.

खळबळजनक! वेश्यावस्तीत टॅक्सी नेण्यास नकार दिला; आरपीएफ जवानाने चालकावरच केला 'अत्याचार'
मुंबई - दक्षिण मुंबईत शनिवारी रात्री धक्कादायक घटना घडली आहे. वेश्यावस्तीत जाण्यास नकार दिल्याने एका टॅक्सी चालकावरच बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाने (आरपीएफ) हे कृत्य केल्याची माहिती समोर आहे. याप्रकरणी माता रमाबाई आंबेडकर मार्ग (एमआरए) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या आरोपी कॉन्स्टेबलचे नाव अमित धनकड आहे.
आरोपी कॉन्टेबल हा शनिवारी रात्री पीडित चालकाच्या टॅक्सीत बसला होता. त्यावेळी कॉन्स्टेबलने टॅक्सी ग्रॅण्टरोड येथील वेश्यावस्तीत नेण्यास सांगितलं. मात्र टॅक्सी तिकडे नेण्यास चालकाने नकार दिला. त्यावेळी कॉन्स्टेबलने चालकाला मारहाण करुन त्याच्यासोबतच अनैसर्गिक कृत्य केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेनंतर पीडित टॅक्सी चालकाने एमआरए पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तात्काळ आरोपी कॉन्स्टेबलला अटक केली. याप्रकरणी आता पोलीस अधिक तपास करत आहेत.
आरोपी कॉन्स्टेबल 11 जानेवारीला दुपारी 4 ते रात्री 11 अशी ड्युटी संपवून आला होता. त्यावेळी त्याने टॅक्सी चालकाला टॅक्सी डिमेलो रोडकडे नेण्यास सांगितली. त्यानंतर त्याने टॅक्सी ग्रॅण्टरोडवरील वेश्यावस्तीत नेण्यास सांगितली. मात्र, टॅक्सी चालकाने त्याला नकार दिल्याने चिडलेल्या कॉन्स्टेबलने त्याला मारहाण केली. आरोपी कॉन्स्टेबलने टॅक्सी चालकाला रेल्वेच्या हद्दीतील निर्जनस्थळी नेऊन अनैसर्गिक अत्याचार करत बलात्कार केला. त्याशिवाय कॉन्स्टेबलने त्याचे पैसे आणि टॅक्सीची चावी देखील काढून घेतल्याचा आरोप आहे.
खळबळजनक! वेश्या वस्तीत टॅक्सी नेण्यास नकार दिला; आरपीएफच्या जवानाने चालकावरच 'अत्याचार' केला https://t.co/CbvSFUjpi9
— Lokmat (@MiLOKMAT) January 13, 2020
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास केला. त्यानंतर एमआरए मार्ग पोलिसांनी आरोपी कॉन्स्टेबलला अटक केली. त्याच्याविरोधात भा. दं. वि. कलम 377 अनैसर्गिक कृत्य, कलम 394 लूट यासह कलम 387,341,324,504 आणि 506 (2 ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी अमितला अटक केली आहे. या प्रकरणाची दखल घेत रेल्वे प्रशासनाने आरोपी जवान अमितला तडकाफडकी निलंबित केले आहे.