Sensational! Rape on a minor girl who was going to farm pda | खळबळजनक! शेतात जाणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार 

खळबळजनक! शेतात जाणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार 

ठळक मुद्देपीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून रैपुरा पोलिसांनी तक्रार दाखल केली.पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत कलम 376 आणि 4 अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली.

सोमवारी चित्रकूट जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली. याप्रकरणी बलात्कार केलेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. 

ही घटना रैपुरा पोलीस स्टेशन परिसरातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी शेतात जात असताना आरोपी तरूणाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता. पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून रैपुरा पोलिसांनी तक्रार दाखल केली. त्यानंतर पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत कलम 376 आणि 4 अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली.

Web Title: Sensational! Rape on a minor girl who was going to farm pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.