Sensational! Girl has Acid burned to death after gang rape | खळबळजनक! तरुणीवर सामूहिक बलात्कार करून अ‍ॅसिडने जाळला मृतदेह

खळबळजनक! तरुणीवर सामूहिक बलात्कार करून अ‍ॅसिडने जाळला मृतदेह

ठळक मुद्देउत्तर प्रदेशमधील बहराइच येथे एका तरुणीवर सामूहिक बलात्कार करून  तिचा मृतदेह अ‍ॅसिडने जाळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.या तरुणीचा चेहरा अ‍ॅसिडमुळे पूर्णपणे जळालेला होता. तरुणीची ओळख लपविण्यासाठी तिचा चेहरा जाळण्यात आला.

नवी दिल्ली - हैदराबाद येथील डॉक्टर प्रियंका रेड्डी यांच्यावर सामूहिक बलात्कार करून त्यांचा मृतदेह जाळल्याच्या घटनेने देशभरात संतापाची लाट उसळली होती. या घटनेनंतर देखील देशात कुठे ना कुठे अशा घटना घडत आहेतच. उत्तर प्रदेशमध्ये अशाच प्रकारची एक घटना उघडकीस आली आहे. उत्तर प्रदेशमधील बहराइच येथे एका तरुणीवर सामूहिक बलात्कार करून  तिचा मृतदेह अ‍ॅसिडने जाळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. कातारनिया घाट जंगलात तरुणीचा मृतदेह सापडला आहे.

उत्तरप्रदेशात एका तरुणीचा मृतदेह स्थानिकांना जळालेल्या अवस्थेत आढळला. उत्तरप्रदेशातील बहराइच जिल्ह्यातील मुर्तिहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तरुणीचा मृतदेह आढळला आहे. मृतक तरुणीची अद्याप ओळख पटलेली नसून घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

पोलिसांच्या प्राथमिक तपासणीनुसार या मुलीचे वय २० वर्षे असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मृतक मुलीचा चेहरा अ‍ॅसिडने जाळल्याचे दिसून येत आहे.अज्ञात आरोपींनी या तरुणीवर सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या केली असावी आणि त्यानंतर तिचा मृतदेह जाळून जंगलात टाकून दिला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या तरुणीचा चेहरा अ‍ॅसिडमुळे पूर्णपणे जळालेला होता. तरुणीची ओळख लपविण्यासाठी तिचा चेहरा जाळण्यात आला. तर शरीरावरही अनेक ठिकाणी जळलेल्याच्या जखमा आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी एक विशेष तपास पथक स्थापन केले आहे. पोलीस उप अधिक्षकांच्या नेतृत्वाखाली हे तपास पथक तपास करणार आहे. तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून पोलीस तिच्या कुटुंबीयांचा शोध घेत आहे. या घटनेच्या चौकशीसाठी पोलीस उपअधिक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे. 

 

 

Web Title: Sensational! Girl has Acid burned to death after gang rape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.