खळबळजनक! तलावात उडी मारून तरुणीने केला आत्महत्येचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2020 20:40 IST2020-03-31T20:38:00+5:302020-03-31T20:40:58+5:30
कामोठे एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

खळबळजनक! तलावात उडी मारून तरुणीने केला आत्महत्येचा प्रयत्न
ठळक मुद्देपरिसरातील व्यक्तींनी तरुणीला तलावातून बाहेर काढले.याबाबत पोलीस तपास करत असून पोलिसांना सुसाइट नोट सापडलेली नाही.
पनवेल - शहरात कोरोनावर मात करण्यासाठी लॉकडाऊन सुरु असताना दुसरीकडे पनवेल शहरात वडाळे तलावात तरुणीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न मंगळवारी केला. त्यामुळे परिसरात खळबळ माजली. नंतर घटनास्थळी काही लोकं जमले आणि त्या परिसरातील व्यक्तींनी तरुणीला तलावातून बाहेर काढले. या तरुणीची प्रकृती गंभीर असून तिला कामोठे एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आत्महत्यामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. याबाबत पोलीस तपास करत असून पोलिसांना सुसाइट नोट सापडलेली नाही.