शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
2
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
4
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
5
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
6
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
8
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
9
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
10
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
11
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
12
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
13
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
14
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
15
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
16
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
17
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
18
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
19
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
20
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका

खळबळजनक! मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून पित्याने केली तरुणाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 8:13 PM

६७ वर्षाच्या वृद्धाने केली २६ वर्षीय तरुणाची केली हत्या

ठळक मुद्देभरचौकात दिवसाढवळ्या हत्या करून आरोपीने नातवाला शाळेत सोडलेबदलापूर पोलिसांना आरोपी वृद्धाला अटक केली आहे. विशेष म्हणजे ही हत्या केल्यानंतर नामदेव हा आपल्या नातवाला सोडायला शाळेत गेले.

बदलापूर - दिवसाढवळ्या एका ६७ वर्षाच्या वृद्धाने २६ वर्षीय तरुणाची हत्या केली आहे. या हत्येने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. विधवा मुलीसोबत तरुणाचे प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून संतापलेल्या बापाने ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे हत्या केल्यानंतर आरोपीने नातवाला शाळेत सोडले. हा खळबळजनक प्रकार बुधवारी दुपारी घडला. बदलापूरपोलिसांना आरोपी वृद्धाला अटक केली आहे. बदलापुरातील शिरगांव भागातील  वर्दळीच्या सुरवळ चौकात दुपारच्या सुमारास नागरिकांना थरार पाहायला मिळाला.  भरदुपारी सचिन शिंदे या २६ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. धक्कादायक म्हणजे एका ६७ वर्षीय नामदेव कोइंडे या वृद्धाने  ही हत्या केली. सचिन हा आरोपीच्या मुलीला वारंवार त्रास देत होता. बदलापूर पोलीस ठाण्यातही याआधी हे प्रकरण गेले होते. मात्र, तरीदेखील सचिनचा छळ सुरूच होता. अखेर सतत च्या सचिनच्या कृत्याने  त्रासलेल्या नामदेव यांनी बदलापुरातील सुरवळ चौकात सचिनची तीक्ष्ण हत्याराने  भोसकून  हत्या केली.

 

 

विशेष म्हणजे ही हत्या केल्यानंतर नामदेव हा आपल्या नातवाला सोडायला शाळेत गेले. या हत्येची माहिती मिळताच बदलापूर पोलीस आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून घटनेचा पंचनामा केला. पोलिसांनी सचिनचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे सचिन हा त्या वृद्ध व्यक्तीच्या मुलीला त्रास देत असल्याची तक्रार बदलापूर पोलीस ठाण्यात गेल्यानंतर देखील पोलिसांनी त्याच्यावर योग्य कारवाई न केल्याने या वृद्ध व्यक्तीला हे पाऊल उचलावे लागले

टॅग्स :MurderखूनbadlapurबदलापूरPoliceपोलिसArrestअटक