खळबळजनक! मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून पित्याने केली तरुणाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2020 20:17 IST2020-01-22T20:13:25+5:302020-01-22T20:17:57+5:30

६७ वर्षाच्या वृद्धाने केली २६ वर्षीय तरुणाची केली हत्या

Sensational! Father murdered young boy on suspicion of having affair with daughter | खळबळजनक! मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून पित्याने केली तरुणाची हत्या

खळबळजनक! मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून पित्याने केली तरुणाची हत्या

ठळक मुद्देभरचौकात दिवसाढवळ्या हत्या करून आरोपीने नातवाला शाळेत सोडलेबदलापूर पोलिसांना आरोपी वृद्धाला अटक केली आहे. विशेष म्हणजे ही हत्या केल्यानंतर नामदेव हा आपल्या नातवाला सोडायला शाळेत गेले.

बदलापूर - दिवसाढवळ्या एका ६७ वर्षाच्या वृद्धाने २६ वर्षीय तरुणाची हत्या केली आहे. या हत्येने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. विधवा मुलीसोबत तरुणाचे प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून संतापलेल्या बापाने ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे हत्या केल्यानंतर आरोपीने नातवाला शाळेत सोडले. हा खळबळजनक प्रकार बुधवारी दुपारी घडला. बदलापूरपोलिसांना आरोपी वृद्धाला अटक केली आहे. 

बदलापुरातील शिरगांव भागातील  वर्दळीच्या सुरवळ चौकात दुपारच्या सुमारास नागरिकांना थरार पाहायला मिळाला.  भरदुपारी सचिन शिंदे या २६ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. धक्कादायक म्हणजे एका ६७ वर्षीय नामदेव कोइंडे या वृद्धाने  ही हत्या केली. सचिन हा आरोपीच्या मुलीला वारंवार त्रास देत होता. बदलापूर पोलीस ठाण्यातही याआधी हे प्रकरण गेले होते. मात्र, तरीदेखील सचिनचा छळ सुरूच होता. अखेर सतत च्या सचिनच्या कृत्याने  त्रासलेल्या नामदेव यांनी बदलापुरातील सुरवळ चौकात सचिनची तीक्ष्ण हत्याराने  भोसकून  हत्या केली.

 


 

विशेष म्हणजे ही हत्या केल्यानंतर नामदेव हा आपल्या नातवाला सोडायला शाळेत गेले. या हत्येची माहिती मिळताच बदलापूर पोलीस आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून घटनेचा पंचनामा केला. पोलिसांनी सचिनचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे सचिन हा त्या वृद्ध व्यक्तीच्या मुलीला त्रास देत असल्याची तक्रार बदलापूर पोलीस ठाण्यात गेल्यानंतर देखील पोलिसांनी त्याच्यावर योग्य कारवाई न केल्याने या वृद्ध व्यक्तीला हे पाऊल उचलावे लागले

Web Title: Sensational! Father murdered young boy on suspicion of having affair with daughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.