खळबळजनक! रिक्षेत ठेवलेल्या बॅगेत सापडला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2019 21:46 IST2019-11-02T21:42:27+5:302019-11-02T21:46:23+5:30
मुलाचा मृतदेह सापडल्याची खळबळजनक घटना घडली.

खळबळजनक! रिक्षेत ठेवलेल्या बॅगेत सापडला मृतदेह
मुंबई - रिक्षेत ठेवलेल्या बॅगेत एका महिन्याच्या मुलाचा मृतदेह सापडल्याची खळबळजनक घटना घडली. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी अज्ञात महिलेविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
वांद्रे पश्चिम येथील कुरेशी नगर परिसरातील मैदानात एक रिक्षा पार्क केलेली होती. गुरुवारी सकाळी रिक्षाचालक मैदानात आला. त्यावेळी त्याला रिक्षात एक बॅग दिसली. त्याने ती बॅग उघडून पहिली तेव्हा त्यात एक महिन्याच्या मुलाचा मृतदेह होता. रिक्षाचालकाने याची माहिती त्वरित वांद्रे पोलिसांना दिली. काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तो मृतदेह ताब्यात घेतला. त्या मुलाची गळा आवळून हत्या केली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी अज्ञात महिलेविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. वांद्रे, खार, सांताक्रुझ परिसरातील रुग्णालयातील नवजात बालकाचा पोलीस डेटा गोळा करत आहे. त्यावरून त्या मुलाची ओळख पटविण्यास मदत होऊ शकते.