वांद्र्यात खळबळ, कुख्यात गुंडावर गोळीबार, हाताला गंभीर दुखापत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 13:45 IST2022-03-17T13:43:25+5:302022-03-17T13:45:19+5:30

Firing Case : रियाज हा अभिलेखावरील गुन्हेगार असून त्याचे काही दिवसांपूर्वी जुहू परिसरात काही लोकांशी भांडण झाले होते आणि त्याने त्यांना मारहाण केली. 

Sensation in Bandra, firing on notorious goons, serious hand injuries | वांद्र्यात खळबळ, कुख्यात गुंडावर गोळीबार, हाताला गंभीर दुखापत 

वांद्र्यात खळबळ, कुख्यात गुंडावर गोळीबार, हाताला गंभीर दुखापत 

मुंबई: वांद्रे परिसरात गुरुवारी पहाटे रियाज नामक इसमावर गोळीबार करण्यात आला. त्यात त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. रियाज हा अभिलेखावरील गुन्हेगार असून त्याचे काही दिवसांपूर्वी जुहू परिसरात काही लोकांशी भांडण झाले होते आणि त्याने त्यांना मारहाण केली. 

त्याच लोकांनी त्याच्यावर गोळीबार केल्याचे त्याचे म्हणणे आहे. याप्रकरणी आम्ही गुन्हा दाखल केला असून ज्या संशयिताचे नाव त्याने घेतले त्यांचा शोध सुरू आहे. मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचे वांद्रे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश देवरे यांनी 'लोकमत' शी बोलताना सांगितले.

 

Web Title: Sensation in Bandra, firing on notorious goons, serious hand injuries