शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
3
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
4
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
5
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
6
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
7
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
8
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
9
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
10
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
11
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
12
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
13
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
14
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
15
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
16
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
17
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
18
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
19
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
20
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत

नागपुरात ज्येष्ठ नागरिकाचे पैसे सायबर गुन्हेगारांनी पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 11:56 PM

सायबर गुन्हेगारांनी निवृत्त अधिकाऱ्यासह दोन ज्येष्ठ अधिकाऱ्यांची १.५० लाखाने फसवणूक केली आहे.

ठळक मुद्देदीड लाख लंपास

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : सायबर गुन्हेगारांनी निवृत्त अधिकाऱ्यासह दोन ज्येष्ठ अधिकाऱ्यांची १.५० लाखाने फसवणूक केली आहे. पहिली घटना प्रतापनगर ठाण्यांतर्गत घडली. दीनदयालनगरातील रहिवासी सत्यनारायण चॅटर्जी (८१) यांना ६ जानेवारीला मोबाईलवर कथित पेटीएमचा मॅसेज आला. चॅटर्जी यांचे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एचडीएफसी बँकेत खाते आहे. दोन्ही खाते पेटीएमशी संलग्न आहे. मॅसेज आल्यानंतर अज्ञात व्यक्तीने चॅटर्जी यांना फोन केला. त्याने पेटीएम बंद होणार असल्याची बतावणी केली. त्याने चॅटर्जी यांना टीम व्ह्यु अ‍ॅप पाठविण्यास सांगितले. त्याने अ‍ॅप डाऊनलोड केल्यास पेटीएम बंद होणार नसल्याचे सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून चॅटर्जी यांनी आपल्या नातवाला मोबाईल दिला. त्यांच्या नातवाने फोन करणाऱ्याने सांगितल्यानुसार टीम व्ह्यु अ‍ॅप डाऊनलोड केले. त्यानंतर त्यांच्या मोबाईलवर एक अर्ज आला. फोन करणाऱ्याने अर्जात दिलेली माहिती भरण्यास सांगितली. त्यात बँक खात्यांची माहिती होती. चॅटर्जी यांच्या नातवाने आधी एसबीआय आणि नंतर एचडीएफसी खात्याची माहिती भरली. त्यानंतर त्यांच्या मोबाईलवर ओटीपी आला. चॅटर्जी यांच्या नातवाने ओटीपी सांगण्यास नकार दिला. त्यानंतरही त्यांच्या दोन्ही खात्यातून ६४ हजार रुपये उडविले. त्यांनी प्रतापनगर ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणूक तसेच आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. अमरनगर मानेवाडा येथील रहिवासी सुखदेव भेरे (६९) यांचे उदयनगरच्या स्टेट बँक ऑफ इंडियात खाते आहे. २१ नोव्हेंबरला अज्ञात आरोपीने त्यांच्या खात्यातून ६० हजार रुपये उडविले. या प्रकरणातून ज्येष्ठ नागरिक सायबर गुन्हेगारांचे शिकार होत असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमnagpurनागपूर