शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

बीएआरसीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ वांद्रेतून बेपत्ता; निर्मलनगर पोलिसांकडून शोध मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2024 09:46 IST

गेल्या चार वर्षांपासून अल्झायमर आजाराने त्रस्त असलेले कोळवणकर हे वांद्रे पूर्व येथील आराधना न्यू एमआयजी कॉलनीत राहतात.

गौरी टेंबकर - कलगुटकरमुंबई - भूकंपशास्त्र अभ्यासक आणि राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले भाभा अणू संशोधन केंद्राचे (बीएआरसी) ज्येष्ठ शास्त्रज्ञ विनायक कोळवणकर (७६) हे गुरुवारपासून वांद्रे येथील निवासस्थानाहून बेपत्ता झाले आहेत. निर्मलनगर पोलिसांनी याप्रकरणी शोध मोहीम हाती घेतली आहे. 

गेल्या चार वर्षांपासून अल्झायमर आजाराने त्रस्त असलेले कोळवणकर हे वांद्रे पूर्व येथील आराधना न्यू एमआयजी कॉलनीत राहतात. गुरुवारी रात्री ते फुले खरेदी करण्यासाठी बाहेर पडले; परंतु घरी परतलेच नाहीत. कोळवणकर यांनी ४० वर्षे बीएआरसीमध्ये काम केले. भूकंपशास्त्र, भूकंपाचा अभ्यास या विषयात त्यांनी प्रावीण्य प्राप्त केले. त्यांच्या संशोधनाने देशांना भूकंप होण्याआधीच्या स्थानांचा अंदाज लावण्यास मदत केली, ज्यामध्ये सूर्य, चंद्र आणि विशिष्ट ठिकाणांचा समावेश आहे. त्यांच्या कार्याचा जगभरातील १२५ भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. दिवंगत राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते त्यांना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांचे पुत्र अमित कोळवणकर हे लंडनमध्ये राहतात. माझे वडील गुरुवारी एकटेच निघून गेले आणि परत आलेच नाही. वांद्रे स्टेशनवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ते दिसून आले. मात्र, नंतर वांद्रे पश्चिम परिसरातून पुन्हा बेपत्ता झाले.  

अद्याप ६८ सीसीटीव्ही कॅमेरे पडताळले!कोळवणकर यांच्या शोधासाठी निर्मलनगर पोलिसांनी आतापर्यंत ६८ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पडताळले आहेत. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आम्ही तीन अधिकाऱ्यांची टीम त्यांच्या शोधासाठी नियुक्त केली आहे. ज्यात ६ ते ७ जणांचा समावेश आहे. पोलिसांनी तपासलेल्या सीसीटीव्ही फुटेजनुसार, तिथून ते वांद्रे स्टेशनला नंतर अंधेरी रेल्वे स्टेशन, सांताक्रुज रेल्वे स्टेशन करत पुन्हा वांद्रे स्टेशनवरून लकी हॉटेलजवळील पेट्रोल पंपजवळ दिसले. आमच्याकडे तक्रार दाखल झाली असून आम्ही त्यांना शोधण्याचा प्रयत्न करत असल्याचे परिमंडळ आठचे पोलिस उपायुक्त दीक्षित गेडाम यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी