लॉकडाऊनमध्ये बाईक जप्त केल्याने गेली नोकरी अन् उचलले टोकाचे पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 20:29 IST2020-06-15T20:28:13+5:302020-06-15T20:29:49+5:30
कुटुंबाचे म्हणणे आहे की, कुरिअर कंपनीने दुचाकी जप्त केल्यामुळे नोकरी हिसकावून घेतल्याने मुलाला वाईट वाटले. एकुलता एक मुलगा घरातील खर्च उचलत होता.

लॉकडाऊनमध्ये बाईक जप्त केल्याने गेली नोकरी अन् उचलले टोकाचे पाऊल
लखनऊ - उत्तर प्रदेशची राजधानी लखऊमध्ये एका कुरिअर कंपनीतून काढल्यानंतर एका २५ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केली. अलीकडेच लॉकडाऊनमुळे पोलिसांनी त्या युवकाची दुचाकी जप्त केली होती. यानंतर कंपनीने साथ सोडल्याने तो तणावाखाली जगत होता. कुटुंबाचे म्हणणे आहे की, कुरिअर कंपनीने दुचाकी जप्त केल्यामुळे नोकरी हिसकावून घेतल्याने मुलाला वाईट वाटले होता. एकुलता एक मुलगा घरातील खर्च उचलत होता.
गोमतीनगर येथील कुरिअर कंपनीत काम करायचा
बहिण कीर्ती यांच्यानुसार, २५ वर्षीय आदित्य मिश्रा, लखनऊमधील हुसैगंज येथील चितवापूर भागात राहत होता. कुरिअर कंपनीत काम करायचा. त्याची नोकरी डेस्कवर होती, परंतु लॉकडाऊनदरम्यान कमी मनुष्यबळ असल्यामुळे त्याला फिल्डवर पाठवण्यात आले होते. जेव्हा कंपनीने त्याला १७ मे रोजी गोमतीनगर येथे कुरियर पाठवण्यासाठी पाठवले तेव्हा आदित्यने नाईलाजास्तव दुचाकी बाहेर काढली. गोमतीनगर फन मॉलजवळ पोलिसांनी दुचाकीवरून दोघांना ताब्यात घेतले आणि बाईक जप्त केली. यानंतर त्याला रजेवर पाठविण्यात आले. कामावर परतल्यानंतर 2 जून रोजी त्याच्याकडून राजीनामा घेण्यात आला.
कंपनीने 10 दिवसाच्या सुट्टीवर पाठविले, त्यानंतर कामावरून कमी केले
दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आदित्य उदास होऊन घरी परतला. लॉकडाऊन दरम्यान कंपनीने 10 दिवस रजेवर जाण्यास सांगितले. कीर्ती म्हणाली की, जेव्हा आदित्यला बोलविण्यात आले तेव्हा त्याच्याकडून राजीनामा घेण्यात आला. त्याला सांगण्यात आले की, आता बाईक नाही तर त्याचे काय काम करणार. घरात एकट्या कमवणाऱ्या आदित्यला याचे दुःख सहन करता आले नाही आणि 9 जून रोजी त्याने आत्महत्या केली.
वडील उमाशंकर यांनी सांगितले की, आदित्यला दुचाकी जप्त केल्यानंतर नोकरी जाण्याने खूप दुखावला होता. तो घरी रडत असायचा. तुला दुसरी नोकरी मिळेल असे बर्याचदा समजावून सांगितले. शेवटी, त्याच्या मनात काय घडले हे माहित नाही जे त्याने इतके मोठे पाऊल उचलले. त्याला दोन बहिणी आहेत. घरचा खर्च करणारा तो एकुलता एक मुलगा होता.
अन्य महत्वाच्या बातम्या...
डॉक्टर पतीला पत्नीने चप्पलेने हाणलं, महिला वकिलासोबत एकत्र पाहिल्याने राग झाला अनावर
अल्पवयीन प्रेयसीला नोट्स देण्यासाठी घरी बोलावले; काकासोबत मिळून केला बलात्कार
पाकचा बुरखा फाडला! ‘हनीट्रॅप’ करणारी ती' हाफिज सईदच्या होती संपर्कात
बोहल्यावर चढलेल्या कट्टर नक्षलवादी महिलेस अटक, दोन्ही हाताने चालवते AK-47