शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
4
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
5
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
6
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
7
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
8
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
9
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
10
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
11
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
14
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
15
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
16
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
17
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
18
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
19
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
20
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश

सीमा हैदर सचिनसोबत नोएडाहूनही होणार होती फरार, पण एक चूक घढली अन्..; पोलिसांनी केला मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2023 21:16 IST

Seema Haider : उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने सोमवारी सीमाची कसून चौकशी केली.

नवी दिल्ली - पाकिस्तानी तरुणी सीमा हैदरला (Seema Haider) अटक होण्याची भीती होती. ती तिची ४ मुले आणि प्रियकर सचिन मीणासह फरार होण्याच्या तयारीत होती. नोएडा पोलिसांशी संबंधित सूत्रांनी मंगळवारी ही माहिती दिली.

सीमा हैदर व्हिसाशिवाय बेकायदेशीरपणे भारतात आली आहे. ती तिचा प्रियकर सचिन मीणासोबत राहत होती. 2019 मध्ये ऑनलाइन गेम (PUBG) खेळताना यांची मैत्री झाली आणि नंतर मैत्रीचे रुपांतर कथित प्रेम झाले. उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने सोमवारी सीमाची कसून चौकशी केली. तसेच, दुसऱ्याबाजूला पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तिने अटक होण्याच्या भीतीने फरार होण्याचा प्लॅनही आखला होता.

नोएडा पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरनुसार, सीमाने म्हटले आहे की, "तिला भारताचा व्हिसा न मिळाल्याने ती ती नेपाळला गेली आणि तिथून बसने नवी दिल्लीला आली. ती 13 मे रोजी तिच्या 4 मुलांसह यमुना एक्सप्रेसवेवर पोहोचली, तेथे सचिन तिची वाट पाहत होता. त्याने त्यांना ग्रेटर नोएडा येथील मोहल्ला आंबेडकर नगर येथे भाड्याच्या घरी नेले." बेकायदेशीरपणे स्थलांतरितांना आश्रय दिल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सचिन मीनाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्याने सीमाची त्याच्या वडिलांशी ओळख करून दिली आणि तिच्याशी लग्न करण्याचा आपला इरादा असल्याचेही सांगितले होते.

'सीमाने भारतीय जीवनपद्धतीचा स्वीकारली तर लग्न' -जर सीमाने भारतीय जीवनपद्धतीचा स्वीक केला, तर लग्नाची परवानगी देईन, असे सचिनच्या वडिलांनी म्हणाले होते. यावर, सीमाही राजी झाली होती. यानंतर सचिनही आपल्या घरी गेला होता. यानंतर, काही दिवसांनी तो आणि त्याचे वडील पुन्हा परत आले. त्यांनी तीला कोर्ट मॅरेजसाठी बुलंदशह येथे कोर्टात नेले होते. यावेळी सीमाने त्यांना तिची कागदपत्रे दाखवली. यावर आपले सचिनसोबत लग्न होऊ शकत नाही कारण आपण भारतीय नागरिक नाही, असे वकिलाने सीमाला सांगितले. 

सीमा फरार होण्याच्या विचारात होती, पण...वकिलाला भेटल्यानंतर सीमाला तिच्या मुलांसह दुसऱ्या ठिकाणी जायचे होते. कारण वकील पोलिसांना माहिती देईल आणि पोलिस आपल्याला अटक करतील, हे तिला माहीत होते. यासंदर्भात तिने पोलिसांना  सांगितले की, 'आम्ही भाड्याचे घर त्वरित सोडले, आमची दिल्लीला जाण्याची इच्छा होती. आम्ही सचिनच्या वडिलांकडून पैसेही घेतले होते, मात्र पोलीस तेथे पोहोचले आणि त्यांनी आम्हाला अटक केली.'

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPakistanपाकिस्तानIndiaभारतPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेशLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट