पत्नीची सेक्स टेप पाहून भडकला पती, मुलांसमोरच केली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2019 20:39 IST2019-01-04T20:38:53+5:302019-01-04T20:39:17+5:30
आपल्या मित्रासोबत सेक्स करत असलेल्या पत्नीचा व्हिडीओ पाहून संतापलेल्या पतीने मुलांसमोरची गोळी झाडून तिची हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

पत्नीची सेक्स टेप पाहून भडकला पती, मुलांसमोरच केली हत्या
वॉशिंग्टन - आपल्या मित्रासोबत सेक्स करत असलेल्या पत्नीचा व्हिडीओ पाहून संतापलेल्या पतीने मुलांसमोरची गोळी झाडून तिची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार अमेरिकेतील फ्लोरिडा येथे घडला असून, आरोपी पतीने आपल्या सासू-आणि सासऱ्यांवरही गोळीबार केला.
आरोपी पती विल्यम स्टिलवेल याने त्याची पत्नी आपल्या मित्रासोबत सेक्स करत असल्याचा व्हिडीओ पाहिला. त्यामुळे त्याचा राग अनावर झाला होता. दरम्यान, संतापलेल्या विल्यमने 9एमएम पिस्तुलातून पतीवर गोळ्या झाडल्या. यावेळी त्याची जुळी मुले त्याला हत्या करू नको म्हणून विनवत होती. मात्र संतापलेल्या विल्यमने पत्नी मोना हिच्यावर धडाधड गोळ्या झाडल्या. त्याच मोना हिचा मृत्यू झाला.
दरम्यान, गोळीबाराचा आवाज ऐकलेल्या व्यक्तीने पोलिसांना फोन केला. या गडबडीत या दाम्पत्याची दोन मुले आणि तीन पाळीव कुत्री घराबाहेर पडण्यात यशस्वी झाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येत विल्यमला अटक केली आहे.